शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

निराश्रित अन् झोपडीत राहणारे लाभार्थी मात्र अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 23:43 IST

२०१८ मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रगणकांकडून घरकुल ड यादीचे सर्वेक्षण केले होते. या सर्व्हेत मोठा घोळ झाला. धनलक्ष्मी घेऊन सर्वेक्षकांनी अपात्र धारकांना पात्र ठरविले. मात्र, विधवा, परित्यक्ता, निराधार, निराश्रित, दिव्यांग, अनुसूचित जाती, मजूर, भूमिहीन लोकांची नावे आहेत. असे अनेक लाभार्थी अपात्र ठरले. एवढेच नाही, तर ज्यांची झोपडी आहे, असेही लाभार्थी अपात्र ठरविले गेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी :  विधवा, दिव्यांग, निराश्रित व झोपडीत राहणाऱ्या लाभार्थ्यांनाच घरकुलापासून वंचित ठेवले गेले. असे लाभार्थी अपात्र कसे होऊ शकतात, असा सवाल उपस्थित होत आहे.मोहाडी तालुक्यात ७७ ग्रामपंचायती आहेत. २०१८  मध्ये ग्रामसभेतून घरकुल लाभार्थ्यांची यादी ‘’ड’’ मागविण्यात आली.  त्या याद्या मंजुरीसाठी शासनास पाठविण्यात आल्या होत्या. मंजुरीसाठी पाठविलेल्या २० हजार ९३४  पैकी १५ हजार ८८६ लाभार्थी पात्र ठरले. ५ हजार २४ लाभार्थ्यांना अपात्र घोषित करण्यात आले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे परत सर्वेक्षण करण्यात यावे.२०१८ मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रगणकांकडून घरकुल ड यादीचे सर्वेक्षण केले होते. या सर्व्हेत मोठा घोळ झाला. धनलक्ष्मी घेऊन सर्वेक्षकांनी अपात्र धारकांना पात्र ठरविले. मात्र, विधवा, परित्यक्ता, निराधार, निराश्रित, दिव्यांग, अनुसूचित जाती, मजूर, भूमिहीन लोकांची नावे आहेत. असे अनेक लाभार्थी अपात्र ठरले. एवढेच नाही, तर ज्यांची झोपडी आहे, असेही लाभार्थी अपात्र ठरविले गेले आहेत. त्यामुळे अनेकांना पावसाळ्यात पडक्या घरात व झोपडीत राहावे लागले. २०२२ पर्यंत सर्वांना घरे, असे केंद्र शासनाने जाहीर केले होते. तसेच निवासी प्रयोजनासाठी असलेली अतिक्रमणे कायम करण्यात आली नाहीत. ग्रामपंचायतींनी पाठविलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव शासनदरबारात पडून आहेत. गरिबांना घरे मिळवीत यासाठी व  मोहाडी तालुक्यातील अपात्र ठरलेल्या व पात्र घरलेल्या घरकुलांचे सर्वेक्षण  पुन्हा करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे यांनी केले आहे.

झोपडीत राहणारी कविता अपात्र सर्व लोकांना घरे देण्याची योजना नावाची आहे. हरदोली येथील झोपडीत राहणारी विधवा असणारी कविता झंझाड या विधवेला अपात्र ठरवून घरकुल मिळण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. अशा अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून दूर ठेवण्यात आले आहे.एकाच गावाची तीनशे घरकुले अपात्रजांभोरा ग्रामपंचायतीमधील  ३१८  घरकुलांचे नाव यादीतून  बाद करण्यात आले आहे. तसेच पालोरा २९५, आंधळगाव २५९, डोंगरगाव २००, हरदोली १७८, कुशारी २१०, मांडेसर १८८, रोहा २१७ ,पिंपळगाव १७८ अशा ७७ ग्रामपंचायतींमधून पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना