शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ईको डेव्हलपमेंटचे लाभार्थी गॅस सबसिडीपासून वंचित

By admin | Updated: July 19, 2015 00:50 IST

तालुक्यातील उमरझरी, शिवनटोला या गावात ईको डेव्हल्पमेंट कमेटीतर्फे वाटप करण्यात आलेल्या गॅस लाभार्थ्यांना तीन...

चौकशीची मागणी : सहायक वनसंरक्षकांना तक्रार, पदाधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरेसाकोली : तालुक्यातील उमरझरी, शिवनटोला या गावात ईको डेव्हल्पमेंट कमेटीतर्फे वाटप करण्यात आलेल्या गॅस लाभार्थ्यांना तीन वर्षांपासून सबसीडी मिळालीच नाही. तरी तात्काळ देण्यात यावी यासाठी गावकऱ्यांनी सहाय्यक वनसंरक्षक नवीन नागझीरा वन्यजीव अभयारण्य उमरझरी यांना निवेदन दिले आहे.ईको डेव्हल्पमेंट कमेटीमार्फत उमरझरी, शिवणटोला या गावात एलपीजी गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. मात्र मागील एक वर्षापासून गॅसची सबसीडी मिळाली नाही. तसेच ईडीसीचे अध्यक्ष व सचिव यांनी तलाव खोलीकरणाचे कामे केली असता. ईडीसी सदस्यांना व गावकऱ्यांना कामाचा हिशोब सादर केला नाही व यासंदर्भात अध्यक्ष व सचिव यांच्याशी चर्चा केली असता उडवा उडवीचे उत्तरे मिळतात. त्यामुळे ईडीसीचे अध्यक्ष व सचिव बदलविण्यात यावे, तसेच हंगामी मजूर रोटेशन पध्दतीने तीन तीन महिन्याचे बदलविण्याचे आदेश आहेत. मात्र वनरक्षकांच्या माध्यमातून तेच तेच मजूर नाव बदलवून घेतले जातात. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असेही या निवेदनात नमुद आहे.या निवेदनावर यशवंत कापगते, किशोर पुराम, मनोहर रामटेके, नरेश बावणे, दशरथ पुराम, हेमराज वाढई, जगदीश सीरसाम, नितेश वटी, राहुल रामटेके, मनोज बोरकर, शरद पर्वते, विठ्ठल वरकडे, मनोहर रामटेके, भास्कर कापगते, देवराम पर्वते, ईश्वर घोळांगे, ज्ञानेश्वर सिरसाम, उत्तम सिरसाम, विनायक गेडाम, किसन वाघाडे, यु. श्रा. रामटेके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)