शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आम आदमी विमा योजनेपासून लाभार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2016 00:31 IST

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबविल्या जातात.

योजना चांगली : अंमलबजावणीसाठी होते टाळाटाळलाखनी : ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबविल्या जातात. परंतु जनजागृतीअभावी व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे या योजना ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे योजना चांगली असूनही लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळू शकत नाही. ग्रामीण परिसरातील नागरिकांसाठी शासनाने सुरु केलेली ‘आम आदमी विमा योजना’ ही चांगली योजना आहे. परंतु जनजागृतीचा अभाव व लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी संबधित कर्मचाऱ्यांची टाळाटाळ करणे यामुळे ग्रामीण भागातील शेकडो नागरिक या योजनेपासून वंचित आहे. ग्रामीण भागातील आम आदमी केंद्रबिंदू मानून शासनाने २००७ मध्ये ‘आम आदमी विमा योजना’ सुरू केली. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील १८ ते ५९ वर्षे वयोगटातील आम आदमी या योजनेचा लाभार्थी होऊ शकतो. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांवर कोणताही भार न देता केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी १०० रूपये भरून विमा उतरविला जातो. लाभार्थ्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसास ३० हजार रूपये, अपघाती मृत्यु झाल्यास ७५ हजार रूपये, अपघातात दृष्टि गेल्यास ७५ हजार रूपये, एक डोळा निकामी झाल्यास ३७ हजार ५०० रूपयांची मदत संबंधित लाभार्थ्यांच्या वारसास विमा कंपनीकडून दिली जाते. याशिवाय लाभार्थ्यांच्या शिक्षण घेणाऱ्या पाल्यास शिष्यवृत्तीसुध्दा दिली जाते, अशी तरतूद आम आदमी विमा योजनेत केलेली आहे.सुरूवातीला केवळ भूमिहिन कुटुंबातील लाभार्थीच या योजनेकरिता पात्र ठरत असत. परंतु योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून ८ जून २०११ रोजी शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार पाच एकरापेक्षा कमी जिरायती व अडीच एकरापेक्षा कमी बागायती शेतजमिन असलेली म्हणजेच अल्पभूधारक व्यक्तीही या योजनेची लाभार्थी होऊ शकते. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबधित तलाठी, ग्रामसेवक, स्थानिक अंगणवाडी सेविका यांच्याकडे देण्यात आली आहे. या योजनेबाबत जनजागृतीच केल्या जात नाही. या योजनेची बऱ्याच लोकांना माहिती नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत ही योजना खऱ्या अर्थाने पोहोचली नाही. तहसील कार्यालयात या योजनेचे फलकही लागलेले होते. त्या फलकावर या योजनेच्या अधिक माहितीकरिता संबंधित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे नमुद करण्यात आले होते. परंतु आता हे फलकही दिसेनासे झाले आहेत. एखाद्याने या योजनेबाबत तलाठी कार्यालयात जावून माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला या योजनेबाबत व्यवस्थित माहितीही दिली जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. (तालुका प्रतिनिधी)