शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थ्यांना वयाचा पुरावा ठरतोय गौण

By admin | Updated: December 27, 2014 01:11 IST

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ वृद्धपकाळ या योजनांची शासनाच्या अधिकाऱ्यांकडून योग्य अंमलबजावणी केली जात नाही.

भंडारा : संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ वृद्धपकाळ या योजनांची शासनाच्या अधिकाऱ्यांकडून योग्य अंमलबजावणी केली जात नाही. परिणामी अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत आहेत. श्रावणबाळ वृद्धपकाळ या योजनेसाठी वृद्ध लाभार्थी हे ६५ वर्षे वयाचे असावे, अशी अट आहे. त्या संबंधी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. या अटीला धरुन आजपर्यंत जिल्हयातील सातही तहसील कार्यालयातून प्रकरणे मंजुर झाली. मात्र आता वैद्यकीय अधिकाऱ्याचे ६५ वर्षे वयाचे प्रमाणपत्र असतानासुद्धा केवळ राशनकार्डवरील व मतदान ओळखपत्रावरील वय चुकीचे असल्याने त्यांचे अर्ज नामंजूर होत आहेत. शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा पुरावा गौण ठरत आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेणारे लाभार्थी वृद्ध व अशिक्षित असल्याने बहुतेक जणांना स्वत:ची जन्मतारीख माहित नाही. त्यामुळे यावेळी तयार झालेले ते मतदान कार्ड व राशनकार्ड यावरील जन्मतारखा आणि त्यानुसार वय अंदाजे टाकले असल्याने ते चुकीचे आहे. ८0 वर्षांच्या वृद्धांनासुद्धा या योजनेपासून वंचित ठेवणाचा प्रकार तालुका प्रशासनाकडून केला जात आहे. विशेष म्हणजे या वृद्ध निराधार लाभार्थ्यांचे अर्ज गावपातळीवर तलाठी कार्यालयातून भरला जातो. तलाठी कार्यालयातून अर्ज तालुकास्तरावर पाठविला जातो. तालुकास्तरावरुन पाठविला जातो. तालुकास्तरावरून त्रुट्या आल्या की, तलाठयांना परत लाभार्थ्यांना सांगून त्रुट्या पुर्ण करेपर्यंत बराच काळ लोटला. शासनानेसुद्धा लाभार्थी पात्रतेच्या अटी अत्यंत क्लिष्ट करून ठेवल्या आहेत. कागदपत्रे गोळा केली तर त्यामध्ये अनेक चुका दाखवून त्या लाभार्थ्यांना अधिकारी हाकलून लावतात, अशा तक्रारी आहेत. (नगर प्रतिनिधी)