लाखांदूर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गासाठी सुरु केलेली विशेष घटक योजना वांद्यात सापडली असून सन २0११ पासून बैलगाड्या उपलब्ध न झाल्याने उचल केलेल्या बैलजोड्या शेतकर्यांसाठी डोईजड झाल्या आहेत.विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील नागरिकांना शेती कामात हातभार लागावा म्हणून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शंभर टक्के अनुदानावर बैलजोडी बैलगाडी व शेती औजारांचे वाटप केले जाते. यासाठी लाभार्थ्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे अर्ज सादर करावयाचा असतो. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर शेती विषयक साधनांचा पुरवठा केला जातो. शेती विषयक साधनांच्या पुरवठय़ा संदर्भात शासनाकडून करारनामा केला जातो. भंडारा जिल्हा परिषदेला कृषी अवजारांच्या पुरवठय़ासाठी महाराष्ट्र कृषी विकास महामंडळ नागपुरने शासकीय दरानुसार करारनामा केला होता. २0११ ला पंचायत समिती लाखांदूर कृषी विभागाकडे प्राप्त १५४ अर्ज जिल्हा परिषदेने वर्ग करण्यात आले होते. यातील सर्व लाभार्थ्यांना बैलजोड्यांचे वाटप करण्यात आले. मात्र आजतागायत बैलजोड्यांचा पुरवठा न केल्याने शेतकर्यांना बैलजोड्यांची काळजी घेणे तेवढे काम शिल्लक राहिले आहे. वारंवार अधिकार्यांना या संदर्भात विचारणा केली असता जि.प. मधून बैलगाड्यांचा पुरवठा करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. अनुदानाअभावी विशेष घटक योजना सन २0१२ ला अर्ज प्राप्त होऊनही लाभ अनुदानाअभावी देण्यात आला नाही. सन २0१३-१४ ला १४८ प्राप्त अर्ज धारक लाभार्थ्यांना वर्ष बदलून गेले तरी कृषी विषयक साहित्यांचा पुरवठा करण्यात आला नाहणी. चुकीच्या धोरणामुळे शासनाची एक चांगली योजना अखेरच्या घटका मोजत असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे. एक कोटी रुपयांचा निधी धुळ खात आहे.(तालुका प्रतिनिधी)
बैलजोडीची योजना चार वर्षांपासून बंद
By admin | Updated: June 3, 2014 23:51 IST