शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेची वाजली घंटा, जिल्हा प्रशासन होतेय सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 05:00 IST

पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची सुमार कमतरता भासली होती. आता तिसऱ्या लाटेत अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून जिल्हा आरोग्य प्रशासनाने  ऑक्सिजन निर्मिती व पुरवठा यावर भर दिला आहे. भंडारासह, अदानी, सनफ्लॅग व अन्य ठिकाणांहून ऑक्सिजन आणण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. याशिवाय ऑक्‍सिजन निर्मिती प्लांटचे कामही धडाक्‍यात सुरू आहे.

ठळक मुद्देऑक्सिजन निर्मितीवर अधिक भर : नियमांचे पालन आवश्यक

इंद्रपाल कटकवारलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेनंतर आता पुन्हा एकदा तिसऱ्या लाटेची घंटा वाजली आहे.  या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा आरोग्य प्रशासनही सज्ज होत असल्याचे दृश्य आहे. त्या परीने जिल्हा आरोग्य विभागाने गंभीर पावलेही उचलली आहेत. जिल्ह्यात पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपला जीव गमावला, तर ५०  हजारपेक्षा जास्त व्यक्ती बाधित झाल्या. एप्रिल व मे महिन्यात दुसऱ्या लाटेची तीव्रता व अनुभव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने या दिशेने वाटचाल करीत आहे. सातही तालुक्यात शंभर खाटा ऑक्सिजन उपलब्धतेसह उभारण्याचे कार्य हाती घेतले आहेत.  यासह जिल्हा सामान्य रुग्णालयात बालकांसाठी २० खाटांचे अतिदक्षता कक्ष स्थापित करण्यात आले आहे. याशिवाय बालकांसाठी ५० खाटांचा विशेष वाॅर्डही तयार करण्यात आला आहे. संभवतः तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठीही जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती व स्राेत वाढविण्यावरही भर दिला आहे.

बेडसची उपलब्धता- तिसऱ्या लाटेची तीव्रता जास्त असल्याचे सुतोवाच केंद्र शासनाने केले आहे. यामुळे कुठलीही जोखीम किंवा धोका न पत्करता रुग्णांसाठी बेड उपलब्ध राहावे, याचीही काळजी घेतली जात आहे.

लहान मुलांसाठी केअर सेंटर- तिसऱ्या लाटेत बालकांवर परिणाम होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञ व आरोग्य संस्थेने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात बालकांसाठी २० खाटांच आयसीयु उभारले आहे.

ऑक्सिजन प्लांट निर्मितीवर भर पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची सुमार कमतरता भासली होती. आता तिसऱ्या लाटेत अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून जिल्हा आरोग्य प्रशासनाने  ऑक्सिजन निर्मिती व पुरवठा यावर भर दिला आहे. भंडारासह, अदानी, सनफ्लॅग व अन्य ठिकाणांहून ऑक्सिजन आणण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. याशिवाय ऑक्‍सिजन निर्मिती प्लांटचे कामही धडाक्‍यात सुरू आहे.सध्या कोविड नियमांचे पालन तंतोतंत होत नसल्याने नागरिक स्वत:हून तिसऱ्या लाटेला आमंत्रण तर देत नाही ना असे दिसून येते.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेता जिल्हा आरोग्य प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ऑक्सिजन पुरवठा, निर्मिती व अत्यंत भर देण्यात आला आहे. बालकांसाठी २० खाटांचा अतिदक्षता कक्ष व ५० खाटांचा वेगळा वाॅर्ड तयार करण्यात आला आहे.-डॉ. रियाज फारुकी,  जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या