शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

विश्वातील प्रत्येक जीव भगवंताचा अंश असल्याने तो आस्तिक असतो

By admin | Updated: November 8, 2016 00:33 IST

विश्वातील असा एक जीव नाही जो भगवान रामाशी प्रेम करत नाही. या विश्वात दोन प्रकारच्या व्यक्ती असतात,

धर्म अध्यात्म : सुश्री महेश्वरीदेवीजी यांचे प्रवचनभंडारा : विश्वातील असा एक जीव नाही जो भगवान रामाशी प्रेम करत नाही. या विश्वात दोन प्रकारच्या व्यक्ती असतात, एक आस्तिक व दुसरा नास्तीक. आस्तिक म्हणजे भगवंताला मानणारा तर नास्तीक म्हणजे भगवंताला न मानणारा होय. त्याच प्रकारे विश्वातील कार्य दोन प्रकारचे असतात. एक मानसिक व दुसरा शारीरिक होय. तिसरा म्हणजे शारीरिक अधिक मानविक होय. या प्रत्येक कार्यामागे एक प्रयोजन असते, ते म्हणजे सुख अथवा आनंद असल्याचे प्रतिपादन सुश्री माहेश्वरी देवीजी यांनी व्यक्त केले.श्री हनुमान मंदिर, म्हाडा कॉलोनी, रामनगर भंडारा येथे सुरु असलेल्या दार्शनिक प्रवचनमध्ये सुश्री महेश्वरी देवीजी श्रोत्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. यावेळी त्यांनी, मुर्खातील मुर्ख व्यक्ती सुद्धा या प्रयोजनाने कार्य करतो. मुर्ख कोणाला म्हणो याकरिता गीतेमध्ये सांगितले आहे की, जो आपल्याला जाणत नाही, मग जो आपल्याला जाणत नाही म्हणजे तो वेडा नव्हे का? मग जगच वेड्याचे इस्पीतळ भगवंतांनी तयार केले आहे. जे एक दुसऱ्यासाठी वेडे असतात. विश्वातील सामान्य संसारातील सुखाकरिता वेडा आहे तर संत हे भगवंताच्या प्रेमासाठी वेडे आहेत. तर भगवंत हे भक्ताच्या प्रेमासाठी वेडे आहेत. या ब्रम्हांडामधील अनंत डोही जीव केवळ आनंदाची इच्छा करतात. तो आनंद पाच प्रकारच्या सामानानी मिळतो. तो म्हणजे शब्द, स्पर्श, गंध, ऐकणे आणि पाहणे. हे संसारातील आनंद सीमीत असते. यामध्ये परस्पर विरोधी क्रिया असतात. उदाहरणार्थ बोलणे आणि चूप राहणे. जेव्हा कामावरून घरी परततो तेव्हा कोणत्याही प्रकारचा गोंधळ न होता शांतता हवी असते. तर घरातील सर्वच लोक बाहेर गेल्यास घरी जी शांतता असते ती खायला धावते. हा जीव चार प्रकारच्या क्रियानी आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याला जीवन हवे असते तो कोणत्याही वाईट परिस्थितीत तो मरू इच्छीत नाही. ज्ञान प्राप्त करू इच्छीतो मग तो कोणत्याही प्रकाराने असेल. तो स्वतंत्र राहायला पसंत करतो, गुलामी नव्हे. सर्वावरती शासन करू इच्छीतो. सर्व माझ्या अंडरमध्ये राहावे असे त्याला वाटतो. ही आनंद प्राप्त करण्याची वृत्ती केव्हापासून आली आहे. जेव्हा तो जन्माला आला तेव्हापासून. कारण जन्मत: जो दु:ख त्याला झाला तो रडून बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो आणि आनंदाची वाट धरतो. कारण तो भगवंताचा अंश आहे. कोणताही अंश आपल्या अंशीशी नैसर्गिक प्रेम करतो. जसे की दिव्याची ज्योत ही वर जाते. कारण ती अग्नीची अंश आहे. आपण भगवंतांशी केव्हापासून प्रेम करतो. जेव्हापासून भगवान आहे. भगवान केव्हापासून जेव्हापासून केव्हा नव्हता.अशाप्रकारे जीव हा नेहमी आनंदाची इच्छा करतो. आनंद आणि भगवान हे पर्यायवाची आहेत. म्हणून जीव आनंदाला मिळवू इच्छीतो. म्हणजेच भगवंताना मिळवू इच्छीतो. म्हणूनच तो आस्तिक आहे आणि निरंतर राहणार. भक्ताची गर्दी प्रवचनात वाढत असून ते भक्तीरसात न्हाऊन निघत असल्याचे आपल्या मधुरवाणीने उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन केले. (जिल्हा प्रतिनिधी)