शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

आश्वासनानंतर वनमजुरांचे उपोषण मागे

By admin | Updated: August 8, 2015 00:46 IST

महाराष्ट्र राज्य वनकर्मचारी व वनमजूर संघटना अंतर्गत साकोली येथील नवेगाव नागझीरा व्याघ्र राखीव क्षेत्रीय ...

साकोली : महाराष्ट्र राज्य वनकर्मचारी व वनमजूर संघटना अंतर्गत साकोली येथील नवेगाव नागझीरा व्याघ्र राखीव क्षेत्रीय कार्यालयासमोर विविध मागण्यासंदर्भात गुरूवारपासून आमरण उपोषणाला बसलेल्या वनमजुरांना गोंदिया येथील वनाधिकाऱ्यांनी मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आज शुक्रवारी उपोषणाची सांगता करण्यात आली. वनविकास महामंडळ भंडाराचे २० हजार हेक्टर क्षेत्र व्याघ्र राखीव क्षेत्रात गेल्याने त्यामध्ये १५ ते २० वर्षापासून कामावर असलेल्या वनमजुर वनकामगारांना कामाअभावी बंद व्हावे लागते. पर्यायाने त्यांना कामावर घेण्यासाठी मागील दोन वर्षापासून चर्चा व पत्रव्यवहार सुरू आहे. तसेच वनसंरक्षक गोंदिया यांनी सदर वनमजुरांना कामावर घेण्यासाठी उपसंचालक व वनक्षेत्रपाल यांचेकडे पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु या अधिकाऱ्यांनी त्या पत्राची दखल घेतली नाही. त्यांना कामावर घेतले नाही. वनमजुरांना आठ तास काम देण्याऐवजी त्यांना २४ तास कामावर ठेवल्या जाते. २३ कुटी आणि १२ गेटवर दरदिवशी ३४८ मजुरांची आवश्यकता असताना केवळ १२५ वनमजूर २४ तास कामावर ठेवले जातात. मात्र १५ ते २० वर्षापासून २३३ रिक्त जागावर वनमजुराची नियुक्तीच केली गेली नाही. यासंदर्भात संघटनेतर्फे अनेकवेळा विचारपुस केली असता उडवाउडवीचे उत्तर दिले जातात. वनमजुरांचे शोषण केल्या जाते. त्यामुळे वनविकास महामंडळ भंडाराचे २० हजार हेक्टर वनक्षेत्र नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रास हस्तातरीत झाल्याने त्यामध्ये १५ ते २० वर्षापासून काम करणाऱ्या वनमजुरांना नियमित कामावर घेण्यात यावे, वनमजुरांना २४ तास काम देण्याऐवजी ८ तास काम द्यावे, २२३ मजुरांची तात्काळ भरती करण्यात यावी, वनमजुरांचे मजुरीत २६८ वरून २८५ रूपये ते २९८ रूपये एवढी वाढ झाली त्याचे एरीअर्स वाटप करण्यात यावे, वनमजुरांचे पगार बँक खात्यात जमा करावे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्रव्यवहाराची अवहेलना करण्याचा अधिकाऱ्यांची कार्यालयीन चौकशी करण्यात यावी, अन्यथा हे आमरण उपोषण पुन्हा तीव्र करण्यात येईल, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला होता. अखेर आज आश्वासनानंतर उपोषणाची रितसर सांगता करण्यात आली. या उपोषणात शंकर सयाम, ताराचंद कमाने, सुखदेव रामटेके, सुरेश रामटेके, सोपान लुटे, परसमोडे, पुरूषोत्तम सिरसाम सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)