शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

शिवबांच्या विचाराप्रमाणे आचरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:09 IST

शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे पुरस्कर्ते होते. छत्रपती शिवरायांचे तैलचित्र काढण्याबरोबर त्यांच्या गणिमी काव्याचे सदविवेक बुध्दीचे गुणात्मक विचार आपल्या डोक्यातील मेंदुमध्ये संग्रहीत करुन समावेशक समाजामध्ये आचरणात आणावे तरच खऱ्या अर्थाने शिवजंयती साजरी करण्याचे सार्थक ठरेल, असे प्रतिपादन आमदार डॉ. परिणय फुके यांनी केले.

ठळक मुद्देपरिणय फुके यांचे प्रतिपादन : ठाणा-पेट्रोलपंप येथील शिवजयंतीचे उद्घाटन

आॅनलाईन लोकमतजवाहरनगर : शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे पुरस्कर्ते होते. छत्रपती शिवरायांचे तैलचित्र काढण्याबरोबर त्यांच्या गणिमी काव्याचे सदविवेक बुध्दीचे गुणात्मक विचार आपल्या डोक्यातील मेंदुमध्ये संग्रहीत करुन समावेशक समाजामध्ये आचरणात आणावे तरच खऱ्या अर्थाने शिवजंयती साजरी करण्याचे सार्थक ठरेल, असे प्रतिपादन आमदार डॉ. परिणय फुके यांनी केले.शिवाजी जयंती उत्सव समिती ठाणा पेट्रोलपंपद्वारे शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी आमदार फुके बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर हे होते. यावेळी पंचायत समिती सदस्य राजेश मेश्राम, ग्रामपंचयत ठाणाचे सरपंच सुषमा पवार, शहापुरचे सरपंच मोरेश्वर गजभिये, खरबी (नाका) चे सरपंच रत्नमाला वाडीभस्मे, गॅस ग्रामीण वितरण सुनिल खन्ना उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर म्हणाले की, शिवाजी महाराज सर्व समाजाला घेऊन चालणारे सेनानायक होते. शिवाजींच्या नावातच त्यांची कार्यशैली दडलेली आहे. ‘शि’ म्हणजे शिका, ‘वा’ म्हणजे वागा, ‘जी’ म्हणजे जिंका अर्थात शिवाजींच्या गुणाप्रमाणे शिक्षण ग्रहन करुन वागा व गणिमी काव्याद्वारे आपला शत्रु ओळखून त्यावर विजय मिळवीत ध्येय साध्य करा.सकाळी ठाणा पेट्रोलपंप येथील युवा मुस्लीम बांधवातर्फे सामुहिक भोजन दानाचे वितरण करण्यात आले. येथे हिंदु- मुस्लिम एक्य सद्भावना दिसायला मिळाली. दुपारच्या सुमारास नि:शुल्क नेत्र तपासणी व गरजु रुग्णांना अत्यल्प दरात चष्माचे वितरण करण्यात आले. तद्नंतर भव्य बाईक रॅली ठाणा- परसोडी- जवाहरनगर, खरबी-शहापुर मार्गे ठाणा टी पॉर्इंट येथे विसर्जीत करण्यात आली. सायंकाळी पंचवीस महिलांचा लेझीम कवायतीद्वारे विविध ठिकाणी कलेची सादरीकरण करण्यात आले. सायंकाळी पाहुण्यांचे भाषणे झाली व स्वराध्य संगीत ग्रुप अमरावती द्वारे शिव संध्याचे आयोजन करण्यात आले. यात अध्य गायकांनी श्रोत्यांचे मने जिंकले. प्रास्ताविक सी. दुरुगकर यांनी केले. संचालन व आभार सचिन तिरपुडे यांनी मानले.यशस्वीतेसाठी शिवजंयती उत्सव समिती, ग्रामपंचायत कार्यालय ठाणा, तंटामुक्त समिती, कल्याणी तिरपुडे ग्रुपचे महिला, लोकसेवा मंडई उत्सव समिती व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.