शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

ही तर ‘अच्छे दिन’ची सुरुवात

By admin | Updated: September 12, 2015 00:36 IST

तत्कालीन सरकारच्या कारभारामुळे देशातील जनता पिचल्या गेली होती. त्यांना न्याय देण्यासाठी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’चा नारा दिला होता.

पटोले यांचे प्रतिपादन : प्रधानमंत्री जीवन ज्योती विम्याचा धनादेश वितरितभंडारा : तत्कालीन सरकारच्या कारभारामुळे देशातील जनता पिचल्या गेली होती. त्यांना न्याय देण्यासाठी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’चा नारा दिला होता. परंतु विरोधकांकडून ‘अच्छे दिन’ची खिल्ली उडविण्यात येत आहे. केवळ १२ रुपये भरुन विमा काढल्यानंतर एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडून दोन लाख रुपयांचा परतावा मिळत असेल तर हे जनसेवा करणाऱ्या केंद्र सरकारचे यश होय, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.भंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर आमदार रामचंद्र अवसरे, कृषी सभापती नरेश डहारे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिल्लारी, तहसीलदार सुशांत बनसोडे, सरपंच प्रभाकर बोदेले, उपसरपंच जगदीश निंबार्ते, पंचायत समिती सदस्य मनिषा वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य नत्थुजी बांते, रिता सुखदेवे उपस्थित होते. मानेगाव बाजार येथील रहिवाशी हौसीलाल सिवाराम खंगार यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत वार्षिक १२ रुपये भरुन फेब्रुवारी महिन्यात प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजनेचा विमा काढला. त्यानंतर प्रकृती अस्वाथ्यामुळे त्यांचे निधन झाले. सरकारने त्यांना या विम्याचा लाभ देताना दोन लाख रुपयांचा परतावा खंगार कुटुंबांना केला.यावेळी बोलताना खा.पटोले म्हणाले, केंद्र सरकारच्या योजना शेतकरी, भूमिहीन व सामान्य जनतेसाठी आहेत. तळागाळातील लोक सुखी व्हावेत, यादिशेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे काम सुरू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अधिकाधिक लोकांचे बँकेत खाते उघडून त्यांना अशा योजनांचा लाभ देण्यासाठी जनजागृती करावी. आणि जनतेनेही त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी विमा काढावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक डांगोरे यांनी तर आभार प्रदर्शन एकनाथ भुरे यांनी केले. या कार्यक्रमाला पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)