शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खेळण्या-बागडण्याच्या वयात साहिल खिळला अंथरूणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 21:48 IST

खेळण्या बागडण्याच्या वयात साहिलला स्नायूंचा दुर्मिळ आजार झाला. वडिलांनी शक्य तेवढे उपचार केले. मुंबईत शस्त्रक्रिया केली. यावर चार ते पाच लाख रुपये खर्चही झाले. मात्र वेदनातून साहिलची सुटका झाली नाही. आता १४ वर्षीय साहिल अंथरुणाला खिळून असून आरोग्य विम्याचाही उपयोग शून्य आहे. अशा या बालकाला आता समाजाकडूनच मदतीची आस आहे.

ठळक मुद्देमदतीची आस : स्नायूच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त, आरोग्यविमा असूनही मदत नाही

तथागत मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : खेळण्या बागडण्याच्या वयात साहिलला स्नायूंचा दुर्मिळ आजार झाला. वडिलांनी शक्य तेवढे उपचार केले. मुंबईत शस्त्रक्रिया केली. यावर चार ते पाच लाख रुपये खर्चही झाले. मात्र वेदनातून साहिलची सुटका झाली नाही. आता १४ वर्षीय साहिल अंथरुणाला खिळून असून आरोग्य विम्याचाही उपयोग शून्य आहे. अशा या बालकाला आता समाजाकडूनच मदतीची आस आहे.साहिल रामलाल गणवीर असे या बालकाचे नाव आहे. सात वर्षाचा असताना त्याच्या प्रकृतीत अचानक बदल दिसायला लागला. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार करूनही सुधारणा होत नव्हती. त्यामुळे नागपूर येथील अस्थिरोग तज्ज्ञांकडे उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी तेथे त्याला स्नायूचा दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाले. साहिलचे वडील रामलाल सनफ्लॅग कंपनीत कंत्राटी कर्मचारी आहेत. घरची परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी साहिलच्या उपचारात कुठेही कमी पडू दिले नाही. परंतु या दुर्मिळ आजारावर हवे तसे उपचार उपलब्ध नाही. त्यामुळे साहिलचे शरीर कमजोर झाले. स्नायूत रक्तपेशी दाटल्याने खेळणारा साहिल अंथरुणाला खिळला.पाच महिन्यापूर्वी साहिलवर मुंबई येथील खासगी दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावर चार ते पाच लाख रुपये खर्च झाले. उधार, उसणवार करून त्यांनी ही शस्त्रक्रिया केली. आता पुन्हा मुंबईला उपचारासाठी न्यायचे आहे. पुन्हा चार ते पाच लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. याही उपचाराने तो बरा होईल असे कुणी सांगत नाही. परंतु असह्य वेदना कमी होतील. त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही अशी आस आहे. कमावलेले पैसे उपचारात गेले. कंत्राटी कामगार पाच लाख रुपयांची व्यवस्था करणार तरी कशी. यासाठी समाजातील दानशूर दात्यांनी पुढे यावे आणि साहिलला वेदनेतून मुक्त करावे अशी अपेक्षा आहे.आरोग्य विमा कुचकामीरामलाल गणवीर यांनी आपल्या तुटपुंज्या वेतनातून आरोग्य विमा काढला. दरवर्षी त्यांच्या खात्यातून ३३७५ रुपये कापले जातात. आपल्या कुटुंबाची यातून आरोग्याची तरतूद होईल अशी अपेक्षा होती. परंतु आता साहिलच्या आरोग्यासाठी होणारा खर्च देण्यास विमा कंपनीने नकार दिल्याचे रामलाल यांनी सांगितले. आमदारापासून मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत आवश्यक कागदपत्रे गोळा करूनही मुख्यमंत्री सहाय्यता निधीही मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.