शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीला सौंदर्यीकरणाचा फटका

By admin | Updated: September 19, 2015 00:46 IST

जसजशी शहराची लोकसंख्या वाढत आहे. तसतशी अतिक्रमणाची समस्याही वाढत आहे.

साकोली : जसजशी शहराची लोकसंख्या वाढत आहे. तसतशी अतिक्रमणाची समस्याही वाढत आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे शहरात वाहतुकीची समस्या बिकट होत चालली आहे. साकोली येथील चौक, रस्ते व गल्लीबोळात अतिक्रमणाचा विळखा आहे.अतिक्रमण निर्मूलनाकरीता नगरपंचायत व तहसील कार्यालय मोहीम राबवित असले तरी ती केवळ औपचारिकताच असते. या अतिक्रमणाच्या समुळ उच्चाटनाकरिता त्यांच्याकडे कोणतेही नियोजन नसल्याचे दरवेळी उघडकीला येते. या अतिक्रमणाच्या विळख्यामुळे सामान्य नागरिकांची मात्र रोज कोडी होते. शहराची लोकसंख्या २० हजारांच्या वर आहे. याच ठिकाणी असलेल्या साकोली शहरात रोज शेकडो नागरिक कामानिमित्त येतात. शहरात मुख्य बाजारपेठ, शासकीय निमशासकीय विविध कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने, आरोग्य व्यवस्थेच्या सर्व सोयी आहेत. येथे रस्त्याच्या कडेला किंवा जेथे थोडीसी मोकळी जागा मिळाली तेथे निलज आणि कायद्याला न जुमानता सर्रासपणे अतिक्रमण केले जाते.अतिक्रमणधारकावर कायद्याचा आणि पालिका प्रशासनाचा वचक राहिला नाही. तसेच अतिक्रमण धारकांना सर्वसामान्य नागरिकांची कोणतीही पर्वा राहिली नाही. मिळेल त्या ठिकाणीही पर्वा राहिली नाही. मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करून कायद्याची पायमल्ली केली जाते. चौकासह प्रत्येक गल्लीबोळात अतिक्रमणाने विळखा घातला आहे. मताच्या राजकारणात अतिक्रमणाच्या समस्येकडे व तक्रारीकडे कानाडोळा केला जातो. कोणी तक्रार केली तरी त्यावर संबंधित विभाग कोणतीही कार्यवाही करीत नाही.जर एखादेवेळी अतिक्रमण कार्यवाही करण्यात आली तरी ती केवळ औपचारीकताच सध्या साकोली येथील एकोडी रोड ते पोलीस स्टेशनपर्यंत भाजी विक्रेते व फुटपाथ दुकानदार रस्त्याच्या बाजुला दुकाने थाटून बसत आहेत. परिणामी वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत तर तहसील कार्यालयासमोर वाहनांच्या अडचणीमुळे समस्या बीकट होत चालली आहे. या समस्येकडे प्रशासनाने कधी डोळे उघडून पाहिलेही नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण निर्मूलनासाठी पुढाकार घेण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)