राजू बांते - मोहाडी
ते आहे ऐतिहासिक स्थळ. पण होतं नावाला. अशा या स्थळाची अवस्था बघण्यासारखी नव्हती. असंस्कारीत कृत्याचा तो ठिकाण गणला जात होता. ओसाडलेल्या जागेला आर्थिक संजीवनी मिळाली. अन् मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सौंदर्य खुलवलं गेलं. आज ते ठिकाण सकाळपासूनच मुलांच्या किलबिलाटीत अनेकांच्या नजरा आपल्याकडे ओढवून घेते. मोहाडीच ऐतिहासिक ते स्थळ म्हणजे हुतात्मा स्मारक. हे ठिकाण गेल्या तीन दशकापासून विस्मरणित झाला होता. इकडे शासन ना प्रशासनाच लक्ष गेल. गावाच्या या स्थळाची शान ओसाड झाली होती. अनेक सामाजिक संस्थांनी हुतात्मा स्थळाचं सौंदर्यीकरण केलं जावं यासाठी प्रशासनाकडे हाक दिली. पण या हाकेला कुठणही दाद देण्यात आली नाही. अखेर तुमसर, मोहाडी क्षेत्राचे आमदार अनिल बावनकर यांनी हुतात्मा स्मारकांच्या त्या स्थळाला आर्थिक मदत दिली. या निधीतून केवळ हुतात्मा स्थळाची इमारत सुंदर केली गेली. एवढ््यात या स्थळाला सौंदर्यात भर पडणार नव्हती. यासाठी पुढाकार घेतला ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी यांनी ग्रामपंचायतीच्याद्वारे हुतात्मा स्मारकाचे सौंदर्य खुलविण्यासाठी विविध योजनेतून निधीची जुळवाजुळव केली.वाताहत झालेल्या हुतात्मा स्मारकांच्या सौंदर्याचा कळस ग्रामपंचायतचे सरपंच गीता निमजे व त्यांच्या सहकारी सचिव, ग्रामपंचायत सदस्यांनी केला. आज हे स्थळ बालकांना संस्कारित करण्याचे ठिकाण झाले आहे. या हुतात्मा स्मारकाला आधीपेक्षा कितीतरी पट शिखरावर नेण्याची किमया ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात आली. आज या ठिकाणी पहाटेपासून वर्दळ असते. लहान मुलांवर बौद्धिक संस्कार केले जाते. २० मे पासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून लहान मुलांचे संस्कार शिबिर भरविण्यात आले आहे. शारीरिक, बौद्धिक व मानसिक तयारी या संस्कार शिबिरातून केली जाणार आहे. आज हुतात्मा स्मारकाचे ठिकाण मोहाडीचे केंद्रबिंदू बनले आहे. धावण्यासाठी टॅÑक तयार करण्यात आला. विविध कार्यक्रमासाठी स्टेज तयार झाला.येथे आज विविधांगी स्वरुपाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. जे ठिकाण ओसाड झाले होते. भग्नावस्था आली होती. ते ठिकाण सौंदर्यात हसत आहे. या कामात सरपंच गीता निमजे त्यांचे सहकारी सदस्य, सामाजिक क्षेत्रात काम करणारे समाजसेवी यांच्या या सौंदर्याच्या योगदानात मोलाचा वाटा आहे.