शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

साकोली तलावाचे सौंदर्यीकरण करणार

By admin | Updated: September 20, 2015 01:11 IST

मागील कित्त्येक वर्षापासून माजी मालगुजारी तलावांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात येत होती.

मामा तलावांची दुुरूस्ती : बाळा काशीवार यांची माहिती साकोली : मागील कित्त्येक वर्षापासून माजी मालगुजारी तलावांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात येत होती. मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने ही मागणी फेटाळली होती. मात्र भाजप सरकार सत्तेत येताच शेतकऱ्यांचे व मासेमार बांधवांचा विचार करून विदर्भातील १,७४३ मामा तलावांची दुरुस्ती करण्याचा ऐतिहासिक निर्णय भाजप सरकारने घेतला. याचा सर्वात जास्त फायदा भंडारा व गोंदिया जिल्ह्याला होणार आहे, अशी माहिती आ. बाळा काशिवार यांनी दिली. साकोली येथील तलावाच्या सौंदर्यीकरणाचाही प्रस्ताव असून त्याचेही काम लवकरच सुरु होणार आहे. यापुर्वी हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय करणारे मामा तलावांची अवस्था फार खराब झाली आहे. दरवर्षी येणारा पाऊस येतो जातो मात्र तलावात पाणीच साठत नाही. परिणामी दिवसेंदिवस पाणी समस्या बिकट होत चालली आहे. त्याला कारणही तसेच आहे. माजी मालगुजारी तलाव ही बऱ्याच वर्षापूर्वी तयार करण्यात आली असून तेव्हापासून या तलावाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने लक्षच दिले नाही. त्यामुळे या तलावांची सिंचन क्षमता घटली व हे तलाव फक्त देखावे म्हणून राहू लागली.या तलावांची दुरुस्ती करून तलावातील गाळ काढण्यात यावी, तलावाचे खोलीकरण करण्यात यावे, यासाठी भाजपने मागील पंधरा वर्षापासून मागणी केली. मात्र ती मागणी मंजूर करण्यात आली नाही. अखेर भाजपाची सत्ता येताच ही मागणी पूर्ण झाली. (तालुका प्रतिनिधी)