वरठी येथील प्रकार : ४०० मजुरांची कामावर उपस्थिती, मुलभूत सुविधांचा राहणार समावेशलोकमत न्यूज नेटवर्कवरठी : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वरठी येथील स्मशानभूमी परिसराच्या सुशोभिकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे सुशोभीकरण होणार असून नाल्यातील माती काढल्यामुळे नाल्याचे खोलीकरण होऊन पाण्याची समस्या दूर होणार आहे. जवळपास ४०० महिला-पुरुष मजूर शनिवारपासून कामावर दिसून आले.वरठी येथील स्मशानभूमीत मूलभूत सुविधा नाहीत. त्यामुळे नागरिकांना नानाधि समस्यांना तोंड द्यावे लागत होते. रोजगार हमी योजने अंतर्गत स्मशानभूमी परिसराचे सुशोभीकरणाच्या कामातून या परिसरात माती टाकून त्यावर खडीकरण होणार आहे. स्मशानभूमी प्रवेशद्वारापासून शेडपर्यंत सिमेंट रस्ता तयार करण्यात येणार आहे.स्मशानभूमीजवळून मोठा नहर आहे. उन्हाळ्यात या नहरात पाणी राहत नाही. एकमात्र असलेली बोरवेल बंद पडली आहे. अशा स्थितीत रोजगार हमी योजने अंतर्गत सुरू झालेल्या माती कामा अंतर्गत नाल्यातून माती काढून स्मशानभूमी परिसरात टाकण्यात येईल. त्यामुळे नाला खोलीकरण होऊन पावसाचे पाणी त्यात वर्षभर साठून राहल्यास घाटावर पाण्याची कमतरता भासणार नाही.रोहयोचे तांत्रिक अभियंता राधेश्याम गाढवे यांच्या पुढाकाराने व सरपंच संजय मिरासे यांच्या कल्पनेतून एकाच कामातून दोन उद्देश साधले जात आहे. नुसते नहर खोलीकरणाचे काम हाती घेतले असते तर स्मशन भूमी परिसराचे सुशोभीकरण राहिले असते. एका कामाच्या मोबदल्यात दोन काम करून उर्वरित कामाचे नियोजन करून गावातील मजुरांना काम मिळेल असा उद्देश समोर ठेऊन कामाचे नियोजन आखण्यात आले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रवी बोरकर, सामाजिक कार्यकर्ते सेवक कारेमोरे, रेवराम गायधने, बंडू कारेमोरे, रोजगार सेवक रेखा रोडगे व संदीप बोंदे्रे उपस्थित होते.रोहयोमुळे हिरवळ साधारणत: चार वर्षपूर्वी स्मशनभूमी परिसरात रोहयो अंतर्गत शेकडो झाडे लावून त्यांचे जतन केल्यामुळे या परिसरात हिरवळ आहे. एकेकाळी सावलीसाठी झाडे नसलेल्या ठिकाणी सद्यस्थितीत शेकडो झाडे आहेत. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून उभारण्यात आलेली हिरवळ उन्हाच्या चटक्यापासून दिलासा देत आहेत. याच झाडाच्या सावलीत आता शेकडो मजुरांना विश्रांतीसाठी जागा मिळाली आहे.
रोहयोतून स्मशानभूमी परिसराचे सुशोभीकरण
By admin | Updated: May 21, 2017 00:18 IST