शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत अस्वल ठार

By admin | Updated: March 20, 2015 00:37 IST

उन्हाळ्याची चाहुल लागताच जंगलातील तलाव आटतात. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेतात. असाच प्रकार आज उघडकीस आला.

साकोली : उन्हाळ्याची चाहुल लागताच जंगलातील तलाव आटतात. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेतात. असाच प्रकार आज उघडकीस आला. नर व मादी अस्वल पाण्याच्या शोधात भटकत रस्त्यावर आले. यात रस्ता ओलांडीत असताना एका अज्ञात वाहनाने नर अस्वलाला जोरदार धडक दिली. यात हे अस्वल जागीच ठार झाले. ही घटना उकारा फाट्यानजीक राष्ट्रीय महामार्गावर आज (गुरुवारी) पहाटेच्या सुमारास घडली.विर्शी फाटा ते चारगांव फाट्यापर्यंत दोन्ही बाजुला जंगल आहे. या जंगलात वन्यप्राण्यांची संख्याही मोठया प्रमाणात आहे. मात्र वनविभागातर्फे उन्हाळ्यात या जंगलात पानवठ्याची सोय करण्यात येत नाही. तलावातील पाणी आस्वलाने या जंगलातील वन्यप्राणी चारगाव गावाशेजारी असलेल्या तलावात पाणी पिण्यासाठी जातात. आज पहाटे एक नर व मादी अस्वल दोन्ही पाण्याच्या शोधात निघाले असताना रस्ता ओलांडित असताना एका अज्ञात वाहनाने नर अस्वलाला जोरदार धडक दिली. यात हे अस्वल जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्राधिकारी येसनसुरे, सहाय्यक वनक्षेत्राधिकारी नारनवरे बिटरक्षक डेवीड मेश्राम, एफडीसीएमचे विभागीय वनव्यवस्थापक इंगोले, वनक्षेत्राधिकारी शहारे, सहाय्यक वनक्षेत्राधिकारी ढोले घटनास्थळी पोहचले. मृत अस्वलाचे शवविच्छेदन डॉ. खोडसकर यानी केले. शवविच्छेदनानंतर या अस्वलाला त्याच ठिकाणी जाळण्यात आले. हे अस्वल दहा ते बारा वर्षाचे असून या अस्वलाचे वजन दिडशे किलो होते ज्या ठिकाणी ही घटना घडली याच ठिकाणी यापुर्वी एका बीबट्यासह अनेक वन्यप्राणी अपघात ठार झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)