शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धावर अस्वलाचा हल्ला; प्रकृती चिंताजनक, भंडारातील ढिवरवाडाची घटना

By युवराज गोमास | Updated: August 21, 2022 13:49 IST

नागपूर येथे उपचारासाठी रवाना

भंडारा : मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धावर अस्वलाचा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना भंडारा तालुक्यातील कोका अभयारण्यालगत ढिवरवाडा ते मांडवी दरम्यान रविवारी सकाळी ८.३० वाजता घडली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर व पायांवर खोलवर इजा झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे.

तुकाराम हिंगे (६५) रा. ढिवरवाडा असे जखमीचे नाव आहे. रविवारी सकाळी ते नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकला ढिवरवाडा ते मांडवी रस्त्यावर गेले होते. यावेळी अचानक एका अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र परिसरात कुणीच नसल्याने ते रस्त्यावर पडून होते. काही वेळानंतर या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळाला. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सरपंच धामदेव वनवे यांनी घटनेची माहिती कोका वन्यजीव अभयारण्यातील अधिकारी तसेच तुमसर वनाधिकाऱ्यांना दिली. 

मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांना भंडारा जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. दरम्यान कोका अभयारण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी माकडे यांनी रूग्णालयात धाव घेतली. डाॅक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. मात्र, प्रकृती चिंताजनक दिसून येताच डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यास नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले.