शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

अपघात टाळण्यासाठी विजेपासून सावधानता बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:02 IST

पावसाळ्यात विजेमुळे दुर्घटना होण्याच्या घटना अधिक घडतात. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहावितरणचे आवाहन : पावसाळ्यात विशेष खबरदारी घेणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाळ्यात विजेमुळे दुर्घटना होण्याच्या घटना अधिक घडतात. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीज तारा, वीज खांब, रस्त्याच्या बाजुचे फिडर पिल्लर, रोहित्राचे लोखंडी कुंपन, फ्युज बॉक्स तसेच घरात असलेली ओलसरे विद्युत उपकरणे, शेती पंपाचा स्वीच बोर्ड आदीकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहज शक्य आहे. मुसळधार पाऊस किंवा वादळी वारा यामुळे झाडाच्या फांद्या तुटून वीज तारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीज खांब वाकला जातो. परिणामी वीज तारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीज प्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीज तारांपासून सावध राहावे, या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये.शहरी व ग्रामीण भागात विजेची कोणतीही दुर्घटना घडल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. कोणत्याही कंपनीच्या मोबाईलवरून तसेच लॅन्डलाईन क्रमांकावरून वीज ग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे.अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असते. अशा ठिकाणची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देता येणार आहे. पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र किंवा वीज पुरवठा बंद करण्यात येतो. नागरिकांच्या हितासाठीच वीज पुरवठा खंडीत होतो. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.घरातील उपकरणे ओलाव्यापासून दूर ठेवापावसाळ्यात घरातील स्वीच बोर्ड किंवा विजेच्या उपकरणाचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील वीज पुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खबरदारी घ्यावी. घरात शॉर्टसर्कीट झाल्यास मे स्वीचवरून वीज पुरवठा बंद करावा. घरातील दूरचित्रवाहिणीचे डीश किंवा एन्टीना वीज तारांपासून दूर ठेवावा. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीच बोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारी सर्व उपकरणे स्वीच बोडार्पासून सर्व बंद करावी. विशेषत: टिनपत्राच्या घरात राहणाºया नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत. दुचाकी टेकवून ठेवू नये. विद्युत खांबांना तार बांधून कपडे वाळू घालू नये, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.