शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सज्ज व्हा, येणारा काळ काँग्रेसचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:01 IST

केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात महागाई वाढवून सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार यांचा आशावाद : जिल्हा काँग्रेस कमिटीचा कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात महागाई वाढवून सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना सिलिंडर्सचे दर ३८२ रुपये करायला ४० वर्ष लागले, परंतु विद्यमान भाजपा सरकारने ४० महिन्यात ७८४ रुपये केले. आता केंद्रीयमंत्री कुठे गेले, असा टोलाही त्यांनी लगावला. कार्यकर्त्यांनो सज्ज व्हा येणारा काळ काँग्रेसचाच आहे, असा आशावाद विधानसभेचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे होते. याप्रसंगी भंडारा विधानसभा प्रभारी मुजिबभाई पठाण, प्रदेश सचिव प्रमिला कुटे, मधुकर लिचडे, बशीर पटेल, विकास राऊत, सीमा भुरे, महेंद्र निंबार्ते, जिल्हा परिषद सभापती नीलकंठ टेकाम, डॉ. अजय तुमसरे, धनराज साठवणे, प्रशांत देशकर, दीपक गजभिये, आशिष पात्रे, प्यारेलाल वाघमारे, रमेश डोंगरे, प्रदीप बुरडे, नीलकंठ कायते, के.के. पंचबुद्धे, प्रेम वणवे, अर्चना वैद्य, मंगला बगमारे, स्वाती लिमजे, सुनील गिºहेपुंजे, कमलाकर रायपूरकर, अनिक जमा पटेल, अजय गडकरी, भूषण टेंर्भूणे, मुकुंद साखरकर, विष्णू रणदिवे, सचिन फाले, नीरज गौर, सचिन घनमारे, राजकपूर राऊत, मनोहरराव उरकूडकर, माणिकराव ब्राह्मणकर, अश्विन नशिने, भूमेश्वर महावाडे, शंकर राऊत, प्रभुजी मोहतुरे, धनराज मोटघरे,मंगेश हुमणे, निलेश सावरबांधे आदी उपस्थित होते.प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी केले. येणाºया काळात पक्ष बळकटीकरिता सर्व कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे असे आवाहन केले. त्यांनी यावेळी काही प्रस्ताव सादर केले. यात पहिला प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करावी. कुठलीही जाचक अट लादू नये.शेवटच्या शेतकºयांना मदत मिळालीच पाहिजे. परंतु या सरकारची कर्जमाफी करायची नियत नाही असे आवर्जून सांगितले. दुसरा प्रस्ताव, यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने भंडारा जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती उत्पन्न झाली त्यामुळे भंडारा जिल्हा शासनाने दुष्काळग्रस्त घोषित करावा. तिसरा प्रस्तावात त्यांनी भारनियमन रद्द करून २४ तास वीज पुरवठा करावा जेणेकरून शेतकºयांना त्याचा लाभ मिळेल अन्यथा पीक करपल्याशिवाय राहणार नाहीत. चौथा आणि अंतिम प्रस्तावात गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल, व रॉकेलचे दर वाढल्यामुळे केंद्र सरकारचा निषेधात्मक प्रस्ताव ठेवण्यात आला. त्वरित यांचे भाव कमी करावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा प्रस्तावातून देण्यात आला. या सर्व प्रस्तावांचे एकमताने अनुमोदन करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल लाखांदूर तालुका अध्यक्ष भूमेश्वर महावाडे, तुमसर तालुका अध्यक्ष शंकर राऊत तसेच धनराज मोटघरे यांचा सत्कार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आला. संचालन महेंद्र निंबार्ते यांनी तर आभार प्रदर्शन प्यारेलाल वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाकरिता शमीम शेख, जाबीर मालाधारी, सीमा भोंगाडे, विलास मोथरकर, पृथ्वीराज तांडेकर, मुकुंद साखरकर, सचिन फाले, जनार्धन निंबार्ते, भारती लिमजे, शमीम पठाण, भावना शेंडे, कमलेश बाहे, इमरान पटेल, कुसन भुरे, गणेश लिमजे, वरगंटीवार, अंबादास मंदूरकर,मंगेश हुमणे, राजू सूर्यवंशी, विनोद जगनाडे, संजय पिकलमुंडे, संजय लोंढेकर, सौरभ बोरकर, हिरामण लांजेवार, टी.डी. मारबते, अंकुश बनकर, एच.एल. लांजेवार, बंडू लांबट, इरफान पटेल, शर्मिल बोदेले, शंतनू मोहिते, आशा भोंगाडे, बोन्द्रे, मनोहर वहिले, विनोद राहुलकर, बंटी नेवारे, कैलास नागदेवे, जीवनु भजनकर, शेख नबाब, आशिष नागपुरे, कमल साठवणे, मुकेश राऊत, विनीत देशपांडे, पराग खोब्रागडे, अंकुश वंजारी आदींनी सहकार्य केले.