शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
3
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
4
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
5
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
6
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
7
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
8
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
9
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
10
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
11
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
12
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
13
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
14
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
15
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
16
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
17
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
18
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
20
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?

राष्ट्रवादीमध्ये असल्याचा अभिमान बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 22:49 IST

महाराष्ट्रासह देशभरातील नागरीक केंद्र सरकार व राज्य शासनाच्या खोटारडेपणापासून वैतागली आहे. सत्तेत येण्यापुर्वी दिलेले आश्वासने पोकळ ठरली आहेत. १५ लाख रुपये खात्यात जमा झाले नाहीत अन् रोजगारही मिळाला नाही. छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करुन सुरु केलेली कर्जमाफी ही फसवी ठरली आहे. आघाडी सरकारच्या काळात सरसकट कर्जमाफी केली होती. या देशातील जनतेला खरे 'अच्छे दिन' मिळाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे, असे प्र्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : लाखांदूर येथे कार्यकर्ता मेळावा, रक्तदान शिबिर, शेकडो तरुणांनी घेतला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : महाराष्ट्रासह देशभरातील नागरीक केंद्र सरकार व राज्य शासनाच्या खोटारडेपणापासून वैतागली आहे. सत्तेत येण्यापुर्वी दिलेले आश्वासने पोकळ ठरली आहेत. १५ लाख रुपये खात्यात जमा झाले नाहीत अन् रोजगारही मिळाला नाही. छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करुन सुरु केलेली कर्जमाफी ही फसवी ठरली आहे. आघाडी सरकारच्या काळात सरसकट कर्जमाफी केली होती. या देशातील जनतेला खरे 'अच्छे दिन' मिळाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे, असे प्र्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.लाखांदूर येथे गुरूवारला आशिर्वाद मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, प्रदेश सचिव अभिषेक कारेमोरे, विधानसभा अध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, महिला आघाडी अध्यक्ष उर्मिला आगाशे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती देविदास राऊत, नरेश दिवटे, नगरसेवक देवानंद नागदेवे, महिला अध्यक्षा कल्पना जाधव, शंकर खराबे, दिपक चिमनकर, रामचंद्र परशुरामकर आदी उपस्थित होते.खासदार पटेल म्हणाले, सध्याचे भाजप सरकार पळपुटे आहे, हे जनतेच्या लक्षात आले आहे. महागाईने कंबरडे मोडलेली जनता आता पर्याय शोधत आहे. लोकसभेच्या पोटनिवडणूकी दरम्यान जाहीर करण्यात आलेले तुडतुड्याची रक्कम तिन महिन्याचा कालावधी लोटूनही अद्यापही मिळाली नाहीत. त्यामुळे जनतेला भाजपला मतदान करायचे नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेला पर्याय निर्माण करा. त्यासाठी मतदारांच्या घरा-घरापर्यंत पोहोचा.यावेळी खासदार मधुकर कुकडे म्हणाले, सन २०१४ मध्ये मोठी लाट आली. या लाटेत अनेकांना दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले. गावातील ग्रामपंचायतच्या कार्यालयातही कधी न गेलेला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढलेला माणूस थेट देशाच्या संसदेत गेला. जनतेच्या मानसिकतेचा विचार करुन भाजपने खोटा प्रचार केला. त्यामुळे ही लाट निर्माण झाली होती. परंतु, आता लाट पुर्णपणे ओसरली आहे. यापुढे कोणतीही लाट येणार नाही. हवेवर, वातावरणावर निवडणूक होणार नाही. लाट ही केवळ एकदाच येते, सारखीच येत नाही. त्यामुळे भविष्य आपले आहे.दरम्यान उपस्थित अन्य मान्यवरांनी देखील मार्गदर्शन केले. आयोजित कार्यकर्ता मेळावा व भव्य रक्तदान शिबिरात युवा कार्यकर्त्यांनी राँकात प्रवेश केला. रक्तदान शिबिरामध्ये जवळपास ५० जणांनी रक्तदान केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकॉ तालुकाध्यक्ष बालु चुन्ने यांनी केले. संचालन राकेश राऊत तर आभार प्रदर्शन आभार राकेश झोडे यांनी केले. कार्यक्रमासाठी राँका युवक अध्यक्ष अ‍ॅड. मोहन राऊत, धनराज हटवार, चंद्रशेखर खेडीकर, शिलमंजू सिंहगडे, विनोद ढोरे, जितू सुखदेवे, साईनाथ रक्तपेढी नागपुरचे डॉ. अनिल ढोणे, डॉ. सतिश सोनवाने व चमू यांनी सहकार्य केले.