शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

सावधान! कोरोना डबलिंग दर वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST

पठाणपुरा वार्डातील बाधित व्यक्तीला २२ ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती करण्यात आले होते. या व्यक्तीला न्यूमोनिया झाला होता. आज सकाळी ८ वाजता त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात १८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. २४ तासातील बाधितांमध्ये ३७ बाधित चंद्र्रपूर शहर व परिसरातील आहेत. बल्लारपूर १९, चिमूर २, वरोरा ५, मूल ६, कोरपना ५, पोंभुर्णा एक व यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून आलेला एक असे एकूण ७६ जण आहे.

ठळक मुद्दे७६ रूग्ण आढळले : एकाचा मृत्यू, जिल्ह्यात १५७१ बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील पठाणपुरा वार्डातील ७२ वर्षीय बाधित व्यक्तीचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतकांची संख्या १८ झाली आहे. आज जिल्ह्यात एकाच दिवशी ७६ पॉझिटिव्ह आढळले. रूग्णांची संख्या १५७१ झाली. उपचारानंतर १०३७ व्यक्ती कोरोनामुक्त झाले. कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट पूर्वी १२-१३ वर गेला होता, नंतर तो २४ पर्यंत आला होता. आता २० वर आला आहे. याचा अर्थ २० दिवसात रुग्ण दुप्पटीने वाढत आहे.पठाणपुरा वार्डातील बाधित व्यक्तीला २२ ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती करण्यात आले होते. या व्यक्तीला न्यूमोनिया झाला होता. आज सकाळी ८ वाजता त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात १८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. २४ तासातील बाधितांमध्ये ३७ बाधित चंद्र्रपूर शहर व परिसरातील आहेत. बल्लारपूर १९, चिमूर २, वरोरा ५, मूल ६, कोरपना ५, पोंभुर्णा एक व यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून आलेला एक असे एकूण ७६ जण आहे. तुकूम, पंचशील चौक, नगीनाबाग, दानववाडी, मित्र नगर, बाबूपेठ, जलनगर, उत्तम नगर, समाधी वार्ड, रयतवारी कॉलनी, जेबी नगर, गांधी चौक, अंचलेश्वर वार्ड, चोर खिडकी वार्डात आज रुग्ण आढळले.५० वर्षांवरील सर्वांचीच तपासणी - जिल्हाधिकारीजिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. कोरोनाने मृत्यू झालेले सर्व व्यक्ती ५० वर्षे वयोगटातील आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर व सर्व नगर परिषद क्षेत्रातील ५० वर्षांवरील सर्वांची आरोग्य पथकाद्वारे घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये पल्स आॅक्सिमीटर, थर्मल स्क्रीनिंगद्वारे तपासणी व नोंद केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज दिली. जिल्ह्यातील १५७१ बाधितांपैकी ० ते ५ वर्षे वयोगटातील ३२ बाधित, ६ ते १८ वर्षे वयोगटातील १२८ बाधित, १९ ते ४० वर्षे वयोगटातील ८८० बाधित, ४१ ते ६० वर्षे वयोगटातील ४०७ बाधित, ६१ वर्षांवरील ९४ बाधित आहेत. १५७१ बाधितांपैकी १०५५ पुरूष व ५१६ बाधित महिला आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या