शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी प्रकल्पाच्या वितरिकेला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:47 IST

शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी, यासाठी सुरू करण्यात आलेला बावनथडी प्रकल्प अखेर अनेक अडथळे पार करीत पुर्णत्वाच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देनिकृष्ट बांधकामाचा पुरावा : प्रकल्प पूर्णत्वाआधीच दुरूस्तीची गरज

आॅनलाईन लोकमततुमसर : शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी, यासाठी सुरू करण्यात आलेला बावनथडी प्रकल्प अखेर अनेक अडथळे पार करीत पुर्णत्वाच्या मार्गावर आहे. रामटेक-तुमसर राज्य महामार्गाला लागून ही मुख्य वितरिका असून काटेबाम्हणी शिवारातून जाणाऱ्या या प्रकल्पाच्या मुख्य वितरिकेला मोठमोठे भगदाड पडले आहेत. निकृष्ट बांधकामाचा हा बोलका पुरावा म्हणता येईल.सन १९७८ मध्ये तुमसर-मोहाडी तालुक्याला वरदान ठरणारा बावनथडी प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. २३ कोटी रूपयांचा हा प्रकल्प ७०० कोटी रूपयांवर पोहोचला असून या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. दुसरीकडे काटेबाम्हणी शिवारात मुख्य वितरिकेला भगदाड पडले आहे. एकीकडे प्रकल्प पूर्णत्वाकरिता जलदगतीने कामे सुरू असली तरी दुसरीकडे या प्रकल्पाच्या दुरूस्तीची कामे करावी लागत आहे.१० वर्षांपूर्वी या वितरिकेच्या अस्तिकरणाची कामे करण्यात आली होती. या १० वर्षात वर्षातून किमान दोन ते तीनवेळा या प्रकल्पाचे पाणी वितरिकेतून सिंचनासाठी सोडण्यात आले तर २० ते २२ वेळा पाणी वाहून गेले. काटेबाम्हणी शिवार मुख्य प्रकल्पापासून सुमारे ३५ कि़मी. लांब अंतरावर आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्गाचा वेग कमी राहतो. या वितरिकेत केवळ सहा ते सात वर्षापूर्वी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.काटेबाम्हणी ते खापा शिवारात सध्या काही ठिकाणी मुख्य वितरिका दुरूस्तीची कामे केली जात आहे. वितरिकेला भगदाड पडल्याने बांधकामाचा दर्जा निकृष्ठ असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते आहे. वितरिकेवरील रस्त्याची माती एका बाजुने ढासळलेली आहे. बावनथडी प्रकल्पाच्या मुख्य व इतर लहान वितरिकांना ठिकठिकाणी भगदाड पडलेले आहे. परंतु अद्याप येथील कामांची चौकशी करण्यात आलेली नाही.हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यावर हा प्रकल्प तांत्रिक विभागाला हस्तांतरण होणार असल्याची माहिती आहे. वितरिका बांधकामाची चौकशी करण्यात आली तर सत्य उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु चौकशी कोण करणार हा मुख्य प्रश्न आहे.वितरिका दुरूस्ती ही एक प्रक्रिया आहे. काटेबाम्हणी शिवारातील वितरिकेला भगदाड पडल्याची पाहणी करून चौकशी करण्यात येईल. आपण येथे नव्याने रूजू झालेलो असून याबाबत अधिक काही सांगता येणार नाही.-पी. व्ही. वाघमोडे, उपविभागीय अभियंता, बावनथडी प्रकल्प तुमसर.