शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी कालव्याला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:01 IST

तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना सुजलाम् सुफलाम् करू पाहण्यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासनाने गत ३५ वर्षापुर्वी बावनथडी नदीच्या मधोमध बावनथडी (राजीवसागर) प्रकल्पाचा पाया रोवला गेला. यंदाच्या खरीप हंगामात पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप तालुक्यात समाधानकारक पाऊसच पडला नाही परिणामी शेतकऱ्यांना धान पीक वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड करावी लागत आहे.

ठळक मुद्देखापा-काटेबाम्हणी येथील प्रकार : बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाच्या मुख्य सिमेंट कालव्याला खापा-काटेबाम्हणी शेतशिवारात भगदाड पडले आहे. त्यामुळे येथील कालवा बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या कालव्यातून वाहत असलेल्या पाण्याच्या प्रवाहाने कालव्यातील माती वाहून जात कालवा फुटण्याच्या भीती बळावली आहे.तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना सुजलाम् सुफलाम् करू पाहण्यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासनाने गत ३५ वर्षापुर्वी बावनथडी नदीच्या मधोमध बावनथडी (राजीवसागर) प्रकल्पाचा पाया रोवला गेला. यंदाच्या खरीप हंगामात पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप तालुक्यात समाधानकारक पाऊसच पडला नाही परिणामी शेतकऱ्यांना धान पीक वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड करावी लागत आहे. तुमसर -मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना बावनथडी प्रकल्प दिवास्वप्न ठरु पाहणाऱ्या प्रकल्पात यंदा पाहीजे तेवढा पाण्याचा मुबलक शिल्लक साठा उपलब्ध नाही. पावसाच्या लपंडावामुळे मात्र सध्याच्या घडीला तालुक्यातील शेतकऱ्यांना धान पीक रोवणीसाठी कालव्यामार्फत पाणी सोडण्यात आले आहे.गत काही वर्षापूर्वीपासून तयार करण्यात आलेल्या खापा-काटेबाम्हणी शिवारातील सिमेंटच्या मुख्य कालव्याला भगदाड पडले असल्याने कालव्यातील माती पाण्याच्या प्रवाहाने वाहून जात कालवा फुटण्याची शक्यता येथे बळावली आहे. तर येथील हजारो शेतकऱ्यांच्या शेतपीकाची व कालव्याची मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. याकडे मात्र संबंधित बावनथडी प्रकल्पाचे व लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनीची फाळणी करीत टाकलेल्या बावनथडी कालव्याचे व वितरीकेचे बांधकाम मात्र अद्याप अपूर्णच असले तरी शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीसाठी कालव्याद्वारे गत चार ते पाच वर्षापासून पाणी सोडण्यात येत आहे.त्या धर्तीवर येथील शेतकऱ्यांच्या शेतजमीनीसाठी देण्यात येणाऱ्या पाण्याच्या मोबदल्यात पाणी कर शेतकऱ्यांकडून नियमीत वसूल करण्यात येते. येथे संबंधित बावनथडी प्रकल्पाचे शाखा अभियंता व उपविभागीय अधिकारी यांच्याकडून मात्र अद्याप पाणी वाटपासंबधी ध्येयधोरण ठरविण्यात आले नाही. प्रकल्पबाधित बहुतांश गावात गावनिहाय सुध्दा पाणी वाटप समिती तयार करण्यात आली असली तरी त्यांच्याकडून संबंधित शेतकऱ्यांच्या शेतजमीनीपर्यत कालव्या द्वारे समितीच्या ध्येयधोरणानुसार पाणी पोहचविण्याची जबाबादारी आहे. मात्र त्या समिती सदस्यांकडून पाणी वाटपच करण्यात येत नसल्याचा प्रकार सुध्दा समोर आला आहे. कालव्याद्वारे देण्यात येणाºया पाण्याचे योग्य नियोजन करीत व अपव्यय टाळत प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर टेलपर्यंत पहिल्यांदा पाणी पोहचवणे गरजेचे असताना येथे नजीकच्या शेतकºयांना प्रथम पाणी पुरवठा होत आहे. यावर कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे हजारो शेतकºयांना बावनथडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्यतेमुळे धान रोवणीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.कालव्याची वेळीच दुरूस्ती गरजेचीप्रकल्पाच्या मुख्य सिमेंट कालव्याला खापा-काटेबाम्हणी शेतशिवारात भगदाड पडले आहे. या समस्येकडे संबंधित बावनथडी प्रकल्पाचे व लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करून कालव्याची वेळीच दुरूस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा येथील कालव्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तवली जात आहे. अन्यथा साप गेल्यावर काठी मारण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होऊ नये, ही अपेक्षा.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्प