शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

-तर बावनथडी प्रकल्पात सामूहिक जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:56 IST

बावनथडी प्रकल्पामुळे बेघर झालेल्या आदिवासीबहुल कमकासुर गावाचे रामपूर येथे पुनर्वसन करण्यात आले.

ठळक मुद्देकमकासूरवासीयांचा इशारा : चार दिवस लोटूनही कारवाई शून्य, आदिवासी बांधवांचे जगणे कठीण

राहुल भुतांगे/मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी प्रकल्पामुळे बेघर झालेल्या आदिवासीबहुल कमकासुर गावाचे रामपूर येथे पुनर्वसन करण्यात आले. परंतु मागील पाच वर्षांपासून पुनर्वसनस्थळी कोणत्याही नागरी सुविधा पुरविण्यात न आल्यामुळे आदिवासी बांधव पुनर्वसित गाव सोडून कमकासुर या स्वगावी परतले आहेत. आता या घटनेला चार दिवस लोटूनही प्रशासनाने या घटनेची दखल घेतलेली नाही. त्यामुळे ‘सरकारता पाई ते आत्मा भडके मात’ असे म्हणत समस्येवर दोन दिवसात तोडगा न निघाल्यास आम्ही २४५ आदिवासी बांधव बावनथडी प्रकल्पात सामूहिक जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे.महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणाºया बावनथडी सिंचन प्रकल्पाच्या गळभरणी करतेवेळी कमकासूर या गावातील आदिवासी कुटुंबांना बंदुकीच्या धाकावर गावाबाहेर काढून सन २०११-१२ मध्ये रामपूर या गावाजवळ पुनर्वसन करण्यात आले. परंतु मागील पाच वर्षांपासून पुनर्वसित गावात १८ नागरी मुलभूत सुविधांचा वाणवा आहे. घर नाही, वीज नाही, पाणी नाही आणि धड रस्तेही नाही, उपजिविकेचे असलेली शेती हिरावल्या गेल्याने उपासमारीचे संकट ओढवले आहे. सन २००६ मध्ये जमिन अधिग्रहण करून जमिनीचा अवार्ड करण्यात आला. मात्र स्थलांतरण सन २०१२ मध्ये झाल्याने सन २०१२ प्रमाणे जमिनीची किंमत देण्यात यावी, कायद्यानुसार आदिवासींना पट्टे मिळावे याकरिता आदिवासी यांचा लढा सुरूच होता.दरम्यान मुलभूत सुविधा मिळणे बंद झाल्याने मूळगावी असलेल्या शेतीवर उदरनिर्वाह करता येईल, यासाठी पुनर्वसित गाव सोडून मूळ गावी परतले. चार दिवस लोटले तरी प्रशासन किंवा लोकप्रतिनिधीने दखल घेतली नाही. त्यामुळे या आदिवसी बांधवांमध्ये असंतोष पसरला आहे. दरम्यान ८ आॅक्टोबर रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश राहांगडाले, अशोक उईके, अनिल टेकाम, लक्ष्मीकांत सलामे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी कमकासुर येथे भेट दिली असता आदिवासींच्या वास्तव जिवनाचे चित्र समोर आले. कमकासूर येथे प्रकल्पग्रस्तांची घरे पडलेली आहेत. तिथे तात्पुरते शेड असून अंधाराच्या काळोख्यात वन्यप्राण्यांच्या सावटात, हलाखीच्या परिस्थितीत त्यांचे जगणे सुरू आहे. या जगण्याला वैतागलेल्या कचरू नेताम या आदिवासी बांधवाने सर्वांसमोर बावनथडी प्रकल्पातच उडी घेतली. मात्र प्रसंगावधानाने त्याला बाहेर काढून त्याची समजूत काढण्यात आली. आता आणखी किती दिवस वाट पाहावे, असे म्हणत दोन दिवसात तोडगा न निघाल्यास कमकासुर येथील २४५ ही आदिवासी बांधव बावनथडी प्रकल्पात सामूहिक जलसमाधी घेणार असा इशारा त्यांनी दिला आहे.जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत मागे वळून पाहायचे नाही. सर्व प्रकल्पग्रस्त जलसमाधी घेणार आहे.- किशोर उईके, सरपंच कमकासुर.प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. प्रकल्पग्रस्तांवरील अन्याय खपवून घेणार नाही. शासनाचे लक्ष वेधण्याकरिता निवदने पाठविली आहेत. वेळप्रसंगी आदिवासीकरिता रस्त्यावरही उतरण्याची तयारी आहे.- राजेंद्र पटले, जिल्हाप्रमुख शिवसेना.रामपूर व गर्रा बघेडा पुनर्वसनस्थळावर मुलभूत सुविधांची माहिती घेण्यात आली. उपजिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. आढावा घेऊन समस्या निकाली काढण्यात येईल.- गजेंद्र बालपांडे, तहसीलदार तुमसर.