पटले यांचे प्रतिपादन : जवाहरनगर येथे कार्यक्रमजवाहरनगर : महात्मा गांधीनी समाजाला सुखी, समृध्द व प्रगत बनविण्यासाठी नैतिक मुल्यांना आपल्या विचारात महत्वाचे स्थान दिले होते. संपूर्ण मानव जातीच्या सर्वांगीण विकासाचे मार्ग दाखविण्याचे काम त्यांनी केले म्हणून त्यांचे विचार आजही प्रासंगिक असुन ग्रामीण परिसरातील जनतेने व युवकांनी त्यांचे विचार आत्मसात करावे व सर्वधर्मसमभाव तत्त्वानुसार आचरण करावे असे प्रतिपादन डॉ. आर. टी. पटले व्यक्त केले. कला व वाणिज्य महाविद्यालय, पेट्रोल पंप (जवाहरनगर) येथील युजीसी दिल्ली द्वारा पूरस्कृत महात्मा गांधी अभ्यास केंद्राद्वारे उमरी येथे एक दिवसीय जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रा. रमेश बागडे, प्रा. डॉ. साधना वाघाडे, डॉ. आर. आर. चौधरी, प्रा. विजय गणविर, व प्रा. डी. एन. डोरले यांची प्रमुख्याने उपस्थित होते.यावेळी प्रा. बागडे यांनी, गावापासुन विश्वापर्यंत प्रचंड मोठा आवाका गांधी विचाराने व्यापला असून गांधीनी आपल्या तत्वज्ञानामध्ये ग्राम स्वच्छतेला विशेष महत्व दिले म्हणुन ग्रामीण परिसरातील जनतेनी ग्रामस्वच्छतेकडे लक्ष केंद्रीत करुन साफसफाई करावी असे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे संचालन डॉ. नलिनी बोरकर यांनी केले तर आभार प्रा. डॉ. आर. एम. मानकर यांनी मानले, कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी उमरी ग्रामस्थांनीही स्वयंस्फुर्तीने सहभाग घेऊन सहकार्य केले. (वार्ताहर)
मूल्यांच्या आधारे समाजजागृती गरजेची
By admin | Updated: January 16, 2016 00:38 IST