शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

लोकशाहीचा पाया अन् आधार ‘मतदार’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 23:35 IST

मतदानाचा प्रमाण अत्यल्प असतो. तसेच मतदाराने आपल्या बहुमुल्य मतदानाचा हक्क बजवावा. मतदान कर्तव्य समजावे. उदासिनता चिंतेची बाब आहे. मतदान नोंदणी व मतदानाचा हक्कासाठी जागृतीची गरज आहे.

ठळक मुद्देमोहाडीत मतदार दिवस : शिल्पा सोनुले यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : मतदानाचा प्रमाण अत्यल्प असतो. तसेच मतदाराने आपल्या बहुमुल्य मतदानाचा हक्क बजवावा. मतदान कर्तव्य समजावे. उदासिनता चिंतेची बाब आहे. मतदान नोंदणी व मतदानाचा हक्कासाठी जागृतीची गरज आहे. सुजान नागरिक व्हा. नेते विवेकबुद्धीने निवडा. प्रत्येक मतदार हा लोकशाहीचा पाया अन् आधार स्तंभ असल्याचे प्रतिपादन तुमसरच्या ३५ विभागीय अधिकारी शिल्पा सोनुले यांनी केले.एन.जे. पटेल महाविद्यालय येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिल्पा सोनुले बोलत होत्या. तहसीलदार सुर्यकांत पाटील म्हणाले, लोकशाही बळकट होण्यासाठी सहभागी व्हायला हवे. मतदार हा लोकशाही प्रगतीचे प्रतिक आहे. सुलभ निवडणुका ही यावेळची थीम असून सक्षमपणे सज्ज होण्याचे आवाहन करण्यात आले. एन.जे. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास राणे, संकुचित निष्ठा समाजकारणात आली. वाईट प्रवृत्ती वाढली. यावेळी नवीन मतदार झालेल्या युवक युवतींना मतदान कार्ड वितरीत करण्यात आले. तसेच निवडणूक ज्ञान परीक्षा झाली त्यात एकनाथ कातकडे, आर.सी. बोरकर, एम.एस. कोहळे, डी.टी. धुळे, आनंद हट्टेवार, आर.एच. भवसागर, प्रभाकर कापगते, भोलेश्वर बारई, श्रद्धा गायकवाड, अश्विन पानतावणे, नितीन ठाकरे, अनिल बोढाले, हेमराज राऊत, राजू भोयर, जे.अ‍े. आकरे, पी.एन. जीभकाटे, पी.आर. भोयर, रमेश गाढवे, बी.जी. गभणे, बी.एन. नाकतोडे यांना प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. मतदार जागृती कार्यक्रमात उत्कृष्ठ कार्य करणारे महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक राजकुमार बांते, एम.जे. पटेल महाविद्यालयाच्या डॉ. विजया राऊत यांचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. तसेच नायब तहसिलदार नवनाथ कातकडे यांनी विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात वक्तृत्व स्पर्धेत प्रथम रूचिता शेंडे, द्वितीय माधुरी बारापात्रे, तृतीय निकिता रोडगे, वादविवाद स्पर्धा प्रथम, प्रगती गायधने, द्वितीय अर्पिता आंबिलकर, तृतीय निकिता मानकर, निबंध स्पर्धा प्रथम आचल लेंडे, द्वितीय डिम्पल गायधने तृतीय प्राजक्ता ठवकर, चित्रकला स्पर्धा शमा सुर्यवंशी, द्वितीय रोशनी कोल्हे, तृतीय निशा बावणे, घोषवाक्य स्पर्धा प्रथम प्रणाली आंबिलकर, द्वितीय आचल सेलोकर, तृतीय प्रियांशू मरसकोल्हे, रांगोळी स्पर्धा प्रथम पूजा बडवाईक, द्वितीय भावना जिभकाटे, तृतीय वैभवी सातपैसे, पथनाट्य स्पर्धेत प्रथम सरस्वती कन्या विद्यालय मोहाडी, द्वितीय श्रीराम विद्यालय बेटाळा, तृतीय महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मोहाडी यांचा क्रमांक आला.सकाळी जि.प. हाय. सरस्वती कन्या विद्यालय, सुदामा विद्यालय, एम.जे. पटेल कॉलेज या विद्यार्थ्यांनी मतदान जागृती रॅली मोहाडी येथे काढली होती. विद्यार्थ्यांना मतदार जागृतीची प्रतिक्षा उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले यांनी दिली.