शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांचा कारभार तुटपुंज्या मानधनावर

By admin | Updated: February 11, 2017 00:27 IST

लोकसभा व विधानसभा सदस्य मानधन वाढावे, यासाठी एक विचाराने एकत्र येवून सरकारवर दबाव निर्माण करून मानधन वाढवून घेतात, ...

अन्यायाची भावना : गावातील प्रथम नागरिकाची उपेक्षा भंडारा : लोकसभा व विधानसभा सदस्य मानधन वाढावे, यासाठी एक विचाराने एकत्र येवून सरकारवर दबाव निर्माण करून मानधन वाढवून घेतात, मात्र ग्रामीण भागातील प्रथम नागरिक म्हणून ओळख असलेल्या सरपंचाना आजही तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. ग्रामपंचायती देशाच्या ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा आहे, असे शासन म्हणत असले तरी गावच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सरपंचांना अवघे एक ते दोन हजार मानधन मिळत आहे. गावचा गाडा हाकणारे सरपंचपद मानाचे असले तरी तुटपुंज्या मानधनामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सरपंचांमध्ये मात्र, अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या पत्र, शासन निर्णयानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या तरतुदीनुसार ग्रामपंचायत स्वायत्त संस्था असून शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नावर मानधन देण्यात येत होते. त्यानुसार ग्रामपंचायतीचे उत्पन्न १० हजार असेल तर सरपंचांना २०० रुपये, १० ते ३० हजार उत्पन्न असेल तर ३०० रुपये, तर ३० हजारापेक्षा जास्त असेल तर ४०० रुपये मानधन मिळत होते. त्याप्रमाणे प्रतिबैठक भत्ता १० रुपये होता, त्यानंतर त्यात कालानुरुप सुधारण करून लोकसंख्या दोन हजारापर्यंत असणाऱ्या गावच्या सरपंचांना ४००, २ हजार ते आठ हजार लोकसंख्येच्या सरपंचांना ६०० ते आठ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावच्या सरपंचांना ८०० रुपये मानधन दिले जात होते, तर ग्रामपंचायत सदस्यांना बैठक भत्ता म्हणून २५ रुपये मिळत होते.राज्यातील सरपंच संघटना व लोकप्रतिनिधी यांनी मानधन वाढीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. शासनाने १५ आॅगस्ट २०१४ पासूनच्या नवीन आदेशानुसार २ हजार लोकसंख्येच्या सरपंचाला १ हजार, ८ हजार लोकसंख्या असेल तर १५०० आणि ८ हजार लोकसंख्येच्या पुढील ग्रामपंचायतीच्या सरपंचांना २ हजार रुपये मानधन जाहीर केले. त्याप्रमाणे उपसरपंचांना इतर सदस्यांप्रमाणे १२ बैठका झाल्यानंतर २०० रुपये प्रतिबैठक म्हणून भत्ता दिला जाणार आहे. यासाठी शासन ७५ टक्के अनुदान देणार आहे. सरपंचांना मानधनात वाढ झाली असली तरी काही सरपंचांना मात्र याची माहितीच नसून जुन्याच नियमाप्रमाणे मानधन मिळत असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)