शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जनतेचा ‘आधार’ कचऱ्यात

By admin | Updated: June 16, 2015 00:35 IST

येथील गौतम वॉर्डातील बौद्ध विहाराच्या बाजुला हजारो आधारकार्ड बेवारस स्थितीत पडून असल्याचे आढळून आले.

पवनीतील प्रकारगौतम वॉर्ड परिसरात आढळले हजारो बेवारस आधारकार्ड पवनी : येथील गौतम वॉर्डातील बौद्ध विहाराच्या बाजुला हजारो आधारकार्ड बेवारस स्थितीत पडून असल्याचे आढळून आले. याची चौकशी करून डाक विभागाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. केंद्र शासनाने मागील दोन वर्षापासून जनतेला आधार कार्ड काढण्याची सक्ती केली असून शासनाच्या विविध योजनाकरीता आधारकार्डची मागणी केली जात आहे. मग ते बँकेचे खाते उघडताना असो किंवा स्वस्त धान्य दुकानातून धान्य उचलण्याचे काम असो. प्रत्येक ठिकाणी आधारकार्ड मागितला जातो. याकरीता शासनाने गावागावांत आधारकार्ड काढण्याची मोहीम राबवून आधारकार्ड काढून घेतले. परंतु, दोन वर्ष लोटूनही अनेकांना आधारकार्ड मिळालेले नाही. परिणामी आधारकार्ड मिळविण्यासाठी लाभार्थ्यांची पायपीट सुरू आहे.नागरिकांनी काढलेले आधारकार्ड हे बंगलोर, मद्रास येथे बनत असल्याची माहिती असून बनलेले आधारकार्ड पोष्टाद्वारे जनतेच्या पत्त्यावर पाठविले जात आहेत. परंतु, पोष्टातील कर्मचारी आधारकार्ड वाटपात गलथानपणा करीत असून पवनी येथील आधारकार्ड वाटपाची जबाबदारी डाक विभागाने रोजंदारी मजुरांवर सोपविली होती. हे आधार कार्ड त्यानेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचा नागरिकांचा आरोप आहे.गौतम वॉर्डातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळलेले आधारकार्ड हे हजारोच्या संख्येत असून हे कार्ड मागील दोन महिन्यापासून येथे पडून असल्याची परिसरातील नागरिकांमध्ये कुजबूज असून अनेकांनी ओळखीच्या लोकांचे कार्ड उचलून नेल्याची माहिती आहे. गौतम वॉर्ड परिसरात आढळून आलेले आधारकार्ड कुणी फेकले? व का फेकले याचा शोध घेणे गरजेचे असून मिळालेले आधार कार्डव्यतिरिक्त किती कार्ड फेकले याचा शोध घेणे गरजेचे आहे. ज्यांनी यापूर्वी आधार कार्ड काढले आहेत. मात्र त्यांचेकडे आधारकार्ड अजूनपर्यंत पोहचले नाहीत अशांना आधारकार्ड मिळवून देण्याची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणात दोषीविरुद्ध कारवाई करण्यात यावी. ज्यांनी आधारकार्ड काढले आहेत परंतु त्यांना कार्ड मिळाले नाहीत त्यांचे आधारकार्ड काढण्याची व्यवस्था विभागाने करावी, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)हा प्रकार आमच्या लक्षात येताच आम्ही सर्व आधारकार्ड डाक विभागात आणले. काही आधारकार्ड ओले झाले असले तरी पत्ता दिसून आलेले कार्ड वाटप करण्यात येणार आहे. पवनी डाकघरात पोस्टमन नाही. त्यामुळे हे काम कंत्राटी मजुराला दिले होते. त्यानेसुद्धा हे काम सोडलेले आहे. याची वरिष्ठांकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. यासाठी दोषी असलेल्या कंत्राटी मजुरांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.- एम.व्ही. निखार, सहायक अधीक्षक, डाकविभाग पवनी.