शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

१२१ दिवसांत बरसला ७९ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:45 IST

मागील वर्षीच्या ८३२.६ मिमी पावसाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १००७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २९ सप्टेंबरपर्यंत पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत हा पाऊस ७९ टक्के आहे.

ठळक मुद्देसरासरी १००७ मिमी पाऊस : वार्षिक सरासरी गाठणे अशक्य

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागील वर्षीच्या ८३२.६ मिमी पावसाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १००७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २९ सप्टेंबरपर्यंत पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत हा पाऊस ७९ टक्के आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या शिल्लक राहिलेल्या अवघ्या ३२ दिवसांत ३२२.४ मिमी पाऊस पडणे जवळजवळ अशक्यच आहे. अशा परिस्थिती यावर्षीच्या खरीप पिकांसोबतच आगामी रबीच्या पिकांनाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यात जवळपास रोवणी ८७ टक्के आटोपली आहे. त्यामुळे रोवलेल्या धानपिकाच्या रोपांना पाण्याची गरज असल्याने शेतकरी आभाळाकडे नजरा लावून परतीच्या पावसाची आतुरतेने वाट पाहात आहेत. वार्षिक सरासरीच्या अंदाजानुसार २९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १२७२.३ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत १००७.८ मिमी पाऊस पडला आहे.सर्वसाधारणपणे पावसाच्या पाच महिन्यात, म्हणजे १ जून ते ३१ आॅक्टोंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १,३३०.२ मिमी पाऊस पडण्याची अपेक्षा असते. पावसाळ्याचे आता केवळ एकच महिना शिल्लक असताना १००७.८ मिमी पाऊस पडल्याने अपेक्षेएवढा पाऊस होण्याची चिन्हे दिसून येत नाही. त्यामुळे वरथेंबी पावसावर अवलंबून असणाºया शेतकºयांना यावर्षी अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी आहे.पावसाच्या पाच महिन्यातील तालुकानिहाय प्रमाण पाहता भंडारा तालुक्यात आॅक्टोेंंबर अखेरपर्यंत १,२६०.८ मिमी पाऊस पडण्याची अपेक्षा असताना आतापर्यंत १०४४.८ मिमी पाऊस पडला आहे. मोहाडी तालुक्यात १,२६०.८ मिमी पावसाची अपेक्षा असताना ९९९.१ मिमी, तुमसर तालुक्यात १,२६०.८ मिमीऐवजी आतापर्यंत १०४१.९ मिमी पाऊस झाला.पवनी तालुक्यात १,२२७.४ मिमीऐवजी आतापर्यंत केवळ ८९० मिमी पाऊस पडला आहे. साकोली तालुक्यात १,३९९.१ मिमीच्या तुलनेत केवळ ९५०.० मिमी, लाखांदूर तालुक्यात १,४५१.३ मिमीच्या तुलनेत १०७३.८ मिमी व लाखनी तालुक्यात १,४५१.३ मिमी पडतो. मात्र आतापर्यत ७६ टक्के म्हणजे १०५५.१ मिमी पाऊस झाला आहे. पावसाची दडी व किडीचा प्रादूर्भाव यामुळे यावर्षी देखील भात पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.पावसाची दडी, खरीप पिके करपलीआॅक्टोंबर अखेरपर्यंत पावसाची नोंद घेतली जात असली तरी गणेशोत्सवानंतर पाऊस येण्याची शक्यता कमीच असते. गणेशोत्सवादरम्यान काही ठिकाणी पाऊस बरसला. त्यानंतर चक्क ऊन पडत आहे. त्यामुळे धान पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.साकोली तालुक्यात ७१ टक्के पाऊसजिल्ह्यातील तालुकानिहाय वार्षिक सरासरी पडणाऱ्या पावसाच्या आकडेवारीवर एक नजर टाकल्यास साकोली तालुक्यात सर्वात कमी ७१ टक्के तर भंडारा ८६, मोहाडी ८३ टक्के, तुमसरमध्ये ८६ टक्के, पवनीत ७७, लाखांदूर ७७, लाखनीत ७६ टक्के पाऊस पडला आहे.