शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बॅनर, होर्डिंग्स हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:05 IST

गजबजलेल्या चौकात विविध जाहिरातींच्या फलकांनी झालेले विद्रुपीकरण लोकसभेच्या आचारसंहितेने अवघ्या एका दिवसात दूर झाले. जिल्हा प्रशासनाने मोहीम राबवत शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व बॅनर, पोस्टर्स हटविले. परिणामी या चौकांनी मुक्त श्वास घेतला.

ठळक मुद्देआदर्श आचारसंहिता : चौकांनी घेतला मोकळा श्वास, पदाधिकाऱ्यांची वाहनेही जमा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गजबजलेल्या चौकात विविध जाहिरातींच्या फलकांनी झालेले विद्रुपीकरण लोकसभेच्या आचारसंहितेने अवघ्या एका दिवसात दूर झाले. जिल्हा प्रशासनाने मोहीम राबवत शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व बॅनर, पोस्टर्स हटविले. परिणामी या चौकांनी मुक्त श्वास घेतला.लोकसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता १० मार्च पासून लागू झाली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सर्वप्रथम शहरातील बॅनर्स, पोस्टर्स काढण्याची मोहीम हाती घेतली. जिल्हाभरातील राजकीय पक्षांसह अन्य संस्थांचे बॅनर व होर्डींग्स् काढण्यात येत आहे. बहुतांशपणे ही कामे बुधवारपर्यंत पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. शहरात विविध चौकांमध्ये मोठमोठाले फलक, बॅनर्स आणि फ्लॅक्स लावण्यात आले आहेत. दिल्लीच्या राजकीय नेत्यांपासून गल्लीतल्या कार्यकर्त्यांचे मोठाले होर्डींग्स चौकाच्या सौंदर्यीकरणात बाधा आणत होते. परंतु त्याविषयी कुणीही शब्द बोलालया तयार नव्हते. मात्र निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि एक एक बोर्ड खाली उतरु लागले.जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने राजकीय पक्षांनी विविध ठिकाणी लावलेले बॅनर व होर्डींग्स काढण्याच्या कामाला युद्ध पातळीवर सुरुवात केली आहे. आचार संहितेचा भंग होऊ नये याची काटेकोरपणे दक्षताही राजकीय पक्ष घेताना दिसून येत आहेत. राष्ट्रीय महामार्गासह जिल्हाभरातील फलक काढल्याने शहरातील चौक व रस्ते मुक्त श्वास घेतील.विश्रामगृह ओसऐरवी राजकीय पक्षांचे बस्तान असलेल्या विश्रामगृहात सध्या शांतता दिसून येत आहे. आदर्श आचार संहिता काळात कुठल्याही राजकीय पक्षाला शासकीय विश्रामगृहाचा वापर करता येत नाही. परिणामी विश्रामगृहात आता शांतता दिसून येत आहे. जवळपास दोन महिने तरी हीच स्थिती कायम राहणार आहे. सोबतच जिल्हा परिषदेसह पंचायत समिती पदाधिकाऱ्यांची वाहनेही शासनजमा झाली आहेत.