शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबीयांच्या आठवणीत बंदी झाले भावुक

By admin | Updated: July 26, 2016 00:45 IST

कळत न् कळत हातून गुन्हा घडला की, मानवाच्या जीवनात न पुसण्याजोगा डाग लागतो.

मन परिवर्तन सभा : जिल्हा कारागृहातील प्रकार, ३०० कैद्यांची कार्यक्रमाला उपस्थितीभंडारा : कळत न् कळत हातून गुन्हा घडला की, मानवाच्या जीवनात न पुसण्याजोगा डाग लागतो. तो आयुष्यभरासाठी राहतो. बंदुकीतून सुटलेली गोळी व घडलेला गुन्हा यातून जीवनाचा पाट बदलू शकत नाही. असे असले तरी कैद्यांनी उर्वरित आयुष्य समाजाच्या हितासाठी वाहिल्यास अनेकांना त्यांच्यावर लागले डाग पुसून काढता येते. त्यामुळे भूतकाळातील घटना विसरून भविष्याचा विचार करण्यासाठी मतपरिवर्तन करा, असे आवाहन मन परिवर्तन टिमने जिल्हा कारागृहातील कैद्यांना केले. यामुळे येथील सुमारे ३०० कैदी भावूक झाल्याचा प्रसंग शनिवारी घडला.गुन्हेगार हे कठोर हृदयाचे किंवा निगरगट्ट असताता, अशी भावना आहे. मात्र, मनपरिवर्तन कार्यक्रमादरम्यान कैद्यांनाही नाजूक हृदय असते ही दिसून आले. कैद्यांचे डोळे पाणावले. आणि ही किमया केली मन परिवर्तन टिमचे अर्पन गोस्वामी, शेफान साईजन ईमॅतुल दास, मनिष गोस्वामी यांनी. मन परिवर्तन टिमच्या वतीने भंडारा जिल्हा कारागृहात सुमारे ३०० कैदी विविध प्रकरणात सजा भोगत आहेत. अशा कैद्यांना समाज वेगळ्या नजरेने बघते. त्यांच्या कुटुंबियांना समाजाकडून हिनतेची वागणूक मिळते. त्यामुळे चुकून घडलेल्या किंवा जाणूनबुजून केलेल्या घटनेतील आरोपींनी भूतकाळ विसरून भविष्याचा विचार करावा व यासाठी मन परिवर्तन सभा घेण्यात आली. मन परिवर्तन सभेत मान्यवरांनी कैद्यांनी आत्मपरीक्षण करावे व त्यांच्या हातून घडलेल्या गुन्ह्याचे प्रायश्चित करा. मन परिवर्तन झाल्यास सर्व बदल आपोआप घडून येते. मनातील अशुध्दता काढून टाका, नकारात्मक विचार काढून टाका, चांगले विचार मनात आणा, अपराधी भावना काढून टाका, व्यसन करू नका, एक आदर्श व्यक्ती बना असे एम. एस. साईजन यांनी मार्गदर्शन केले. तर मनिष गोस्वामी यांनी, गुन्हेगारांना रडताना पाहिले असून गुन्हे करून काहीच मिळत नाही. फक्त वाट्याला दु:ख येते. यावेळी कैद्यांकडून गुन्हा न करण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी कारागृह अधिक्षक अनुपकुमार कुमरे, हर्षद अन्सारी, गितेश बोरकर, रीकसन वर्गिस, पोलीस उपनिरीक्षक मेगडे व कारागृहातील कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)