शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बँकांची सुरक्षा व्यवस्था तोकडी

By admin | Updated: December 23, 2014 22:57 IST

तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकासह सहकारी बॅका व पतसंस्था आहेत. या बँक व पतसंस्थांमधून दररोज कोट्यवधींची देवाण घेवाण होते. मात्र रात्री सुरक्षेसाठी काही बँका व पतसंस्थांमध्ये सुरक्षारक्षकच नाही.

संजय साठवणे - साकोली तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकासह सहकारी बॅका व पतसंस्था आहेत. या बँक व पतसंस्थांमधून दररोज कोट्यवधींची देवाण घेवाण होते. मात्र रात्री सुरक्षेसाठी काही बँका व पतसंस्थांमध्ये सुरक्षारक्षकच नाही. त्यामुळे या बँकांची सुरक्षा रामभरोसे आहे. मागील आठवड्यात एकोडी येथील स्टेट बँकेच्या एटीएम तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या आरोपींचा शोध लागलेला नाही. साकोली तालुक्यात १२ राष्ट्रीयकृत बँकासाकोली तालुक्यात बारा राष्ट्रीयकृत बँका, सहकारी तत्वावर चालणाऱ्या पाच बँका व सात पतसंस्था आहेत. या सर्व बँका व पतसंस्थामधून दररोज लाखो करोडो रुपयाची देवाण घेवाण होत असून हजारो ग्राहक या बँक व पतसंस्थेत कामानिमित्त येतात. या बँकांमध्ये रोख, सोने असा किमती ऐवज ठेवला असतो. दिवसेंदिवस गुंडगिरी प्रवृत्ती वाढत आहे. सोबतच चोरीच्या घटनाही वाढत आहेत. यादृष्टीने पोलीस प्रशासनातर्फे सुरेक्षेच्या दृष्टीने प्रत्येक बँकांना व पतसंस्थांना सुरक्षा रक्षकांसह सीसीटीव्ही लावण्यासंबंधी सांगण्यात येत आले असले तरी बोटावर मोजण्याइतपत बँकांनीच याची अंमलबजावणी केली आहे. उर्वरीत बँका किंवा पतसंस्थांत सुरक्षा गार्ड व सीसीटीव्ही अजूनपर्यंत लावली नाही. त्यामुळे रात्रीची सुरक्षा पोलिसांनाच करावी लागते.