शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बँक व्यवस्थापक मुद्रा लोनसाठी करतात अपमानीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:32 IST

मोहाडी तालुक्यातील पालोरा अलाहाबाद बँक व्यवस्थापकाच्या कारभारामुळे सुशिक्षित बेरोजगार त्रस्त आहेत. मुद्रा लोन मागण्यासाठी बँकेत जाणाºया सुशिक्षित बेरोजगारांना अपमानीत केले जाते. त्यांना मुद्रा लोनची माहिती दिली जात नाही.

ठळक मुद्देकारवाईची मागणी : सुशिक्षित बेरोजगारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील पालोरा अलाहाबाद बँक व्यवस्थापकाच्या कारभारामुळे सुशिक्षित बेरोजगार त्रस्त आहेत. मुद्रा लोन मागण्यासाठी बँकेत जाणाºया सुशिक्षित बेरोजगारांना अपमानीत केले जाते. त्यांना मुद्रा लोनची माहिती दिली जात नाही. पोलीस स्टेशनला तक्रार करुन फसविण्याचा प्रयत्न करतात. या गैरप्रकारांमुळे बेरोजगार बँकेत जाण्यास घाबरत असून शासन नर्णयाची अवहेलना करणाºया व्यवस्थापकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.पालोरा परिसरातील तक्रारदार सुशिक्षित बेरोजगार चंद्रमनी अशोक खोब्रागडे, रत्नदीप नत्थू मेश्राम, राकेश शत्रूघ्न आराम, संदीप बळवंत खोब्रागडे, योगेश्वर काशिनाथ चिंधालोरे, प्रगत प्रमोद तिरपुडे हे युवक अलाहाबाद बँक शाखा परिसरात वास्तव्याला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या योजनेनुसार प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती घेण्याकरिता वेळोवेळी बँकेत गेले असता त्यांना व्यवस्थापकांनी माहिती दिली नसल्याचा आरोप आहे. योजनेसंबंधाने चालढकल केली जाते. लाभ दिला जात नाही. माहिती विचारल्यास दुसऱ्या दिवशी येण्यास सांगतात. दुसऱ्या दिवशी गेल्यास पुढील तारखेस येण्यास सांगतात. एक प्रकारे युवकांना शारीरिक व मानसिक त्रास देण्याचे धोरण त्यांच्याकडून राबविले जात आहे. एक सुशिक्षित बेरोजगार व्यवस्थापकांना माहिती विचारल्यास पोलीस स्टेशन करडीला खोटी माहिती देवून फसविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बेरोजगार भयभीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जे व्यक्ती व्यवसाय करीत नाही, अशंना मुद्रा लोन दिले जात असल्याने बेरोजगारांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.