शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

बँक कर्मचाऱ्याने ५० लाखांनी गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:21 IST

बँकेत आलेले धनादेश स्वत:च्या नावावर जमा करून रक्कम गहाळ करण्याचा गोरखधंदा भंडारा शहरातील अ‍ॅक्सिस बँकेच्या मुख्य शाखेत उघडकीस आला.

अ‍ॅक्सिस बँकेतील प्रकार : आरोपीला २५ पर्यंत पोलीस कोठडीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बँकेत आलेले धनादेश स्वत:च्या नावावर जमा करून रक्कम गहाळ करण्याचा गोरखधंदा भंडारा शहरातील अ‍ॅक्सिस बँकेच्या मुख्य शाखेत उघडकीस आला. यात बँकेतील अस्थायी डेटा आॅपरेटरने हा प्रकार केला असून त्याने ५० लाखांनी गंडविले. याप्रकरणी त्याला अटक केली आहे. रत्नाकर नंदनवार (२२) असे आरोपी डेटा आॅपरेटरचे नाव आहे. भंडारा शहरातील अ‍ॅक्सिस बँकेच्या मुख्य शाखेत नोव्हेंबर २०१६ पासून मे २०१७ पर्यंत डेटा आॅपरेटर म्हणून अस्थायी स्वरूपात रूजू झाला. एक्सिस बँकेच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्या बँक धनादेश खातेधारांनी एलआयसीच्या किस्तीची रक्कम धनादेशातून वठविण्याकरिता बँकेत जमा केले. या धनादेशाऐवजी बनावट धनादेश बनवून त्या धनादेशाद्वारे बँकेतून रक्कम काढल्याचा गोरखधंदा रत्नाकर नंदनवार याने सुरू केला. असे एक ना दोन तब्बल ४१ धनादेश स्वत:च्या नावावर जमा केले. यानंतर बिंग फुटू नये म्हणून विड्रॉलनंतर बनावट धनादेश काढून त्याऐवजी ओरिजनल धनादेश लावून कोअर बँकेची फाईल तयार करीत होता. अशा ४१ धनादेशातून रत्नाकरने ४८ लाख ५० हजारांची रक्कम स्वत:च्या खात्यावर जमा करून बँक धनादेश ग्राहकांना गंडविले. दरम्यान त्याने या रक्कमेतून १७ लाख रूपये किंमतीची महागडी होंडा सिटी चारचाकी वाहन, एक लाखाची दुचाकी, दीड ते दोन लाख रूपये किंमतीचे एअर कंडीशनर, महागड्या घड्याळी व चैनीच्या वस्तुवर रक्कम उधळली. दरम्यान ज्या खातेदारांनी एलआयसीची रक्कम भरली ती रक्कम त्यांच्या खात्यातून वळती झाली. मात्र ती एलआयसीच्या खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे खातेदारांनी याची चौकशी केली असता हा आर्थिक घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी रत्नाकरविरूद्ध भादंवि ४२०, ४७१, ४०८, ४०९, कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयात हजर केले असता २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे करीत आहे.