शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

मोहफुलावरून बंदी उठली; आता प्रक्रिया उद्योगाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:37 IST

मोहन भोयर तुमसर: राज्य शासनाने मोहफुलावरील उत्पादन शुल्क विभागाचे निर्बंध उठविले. त्यामुळे मोहफूल संकलन करून विक्री करणे सोयीचे झाले ...

मोहन भोयर

तुमसर: राज्य शासनाने मोहफुलावरील उत्पादन शुल्क विभागाचे निर्बंध उठविले. त्यामुळे मोहफूल संकलन करून विक्री करणे सोयीचे झाले आहे. यामुळे बाजारपेठ खुली झाली. मोहफुलाला अपेक्षित दर मिळेल व परप्रांतातून चोरीने मोहफूल येणार नाही. यामुळे स्थानिक मोहफूल संकलित करणाऱ्यांना बाजारपेठेत चांगला भाव मिळेल. त्यामुळे मोहफूल उपलब्ध असणाऱ्या परिसरात मोहफूल प्रक्रिया उद्योगाची आता प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यातील जंगलात व शेताच्या बांधावर अनेक मोहफुलांची झाडे दिसतात. जिल्ह्यातील तुमसर ,साकोली, लाखांदूर, अड्याळ या परिसरात मोठ्या प्रमाणात फुलांची झाडे आहेत. यापूर्वी बंदी असल्यामुळे ह्या फुलांना कमी किमतीत विक्री करावी लागत होती. जंगलव्याप्त परिसरात फुलांची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. आदिवासी बांधव फुले जमा करण्याचे काम करतात. त्यांच्याकडून अत्यल्प दरात खरेदी केल्या जात होती. नाईलाजाने त्यांना कमी किमतीत विक्री करावी लागत होती.

दरवर्षी मार्च ते मे दरम्यान वृक्ष बहरतो. एका मोहवृक्षापासून सुमारे ४० ते ५० किलोग्रॅम व मोहफूल प्राप्त होते. आतापर्यंत दारू गाळप करण्याकरिता मोह फुलांचा उपयोग केला जात होता. तसेच परप्रांतातून चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात आयात केला जात होता. बाजारपेठ बंद असल्यामुळे काही व्यावसायिकांचे फावत होते. आता बाजारपेठ खुली झाल्याने व मोहफुलांना सुद्धा चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे.

येथील काही लोकांकडेच मोहफूल खरेदीचा परवाना होता.

मोहफुलापासून गावठी दारू तयार करण्यात येत होती. परंतु मोहफुलाच्या औषधीकरिता, पशुखाद्य, शीतपेय, इंधनासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात मोहफुलांची मागणी व त्याचा भाव येथे अधिक येणार आहे.

प्रक्रिया उद्योग व संशोधनाची गरज -

ऊस, संत्रा, धान्य, द्राक्षे, काजू या पासून दारू तयार केली जाते. त्यांच्या कारखान्यांना शासनाची मान्यता आहे. त्याचप्रमाणे मोहफुलापासून दारू तयार करणे व औषधात वापर होण्याकरिता प्रक्रिया उद्योगाची व त्यावर संशोधन करण्याची गरज आहे. मोहफूल हे औषधीयुक्त असल्यामुळे मोहफूल वृक्षलागवड चळवळ राबविण्याची गरज आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत मिळणार आहे. तसेच आदिवासी बांधव व शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न वाढण्याच्या दृष्टिकोनातून प्रक्रिया उद्योग लवकर सुरू होण्याची गरज आहे. आर्थिक विकासाला अधिक चालना मिळेल.

बॉक्स

तुमसर तालुक्यात प्रक्रिया उद्योग व्हावा

तुमसर तालुक्यातील सुमारे ४५ गावे ही आदिवासीबहुल असून ती जंगलव्याप्त परिसरात आहेत. या परिसरात मोहफूल झाडांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तुमसर तालुक्यात मोहफुलावरील प्रक्रिया उद्योग केंद्र स्थापन करण्याची गरज आहे. येथील आदिवासी बांधवांकडे जमीन नाही. त्यामुळे प्रक्रिया उद्योगात त्यांच्या हाताला रोजगार प्राप्त होईल.

" तुमसर तालुक्यात ४५ गावे आदिवासीबहुल असून बावनथडी धरणामुळे काही गावे विस्थापित झाली. त्या विस्थापित गाव परिसरात मोहफुलावरील प्रक्रिया उद्योग स्थापन करून आदिवासी बांधवांना येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी.

अशोक उईके, जिल्हाध्यक्ष आदिवासी काँग्रेस, व महाराष्ट्र आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त