शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशात महाराष्ट्रातील एसटी बसेसला प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 05:00 IST

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या भंडारा विभागाच्या अनेक बसेस मध्य प्रदेशात जातात. शेकडाे प्रवासी एसटी बसने मध्य प्रदेशात जातात. तसेच खासगी बसेसचाही उपयाेग केला जाताे. परंतु अलीकडे महाराष्ट्रात विशेषत: विदर्भात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे.  त्यामुळे मध्य प्रदेश सरकारने खबरदारीची उपाययाेजना म्हणून महाराष्ट्रातून येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या आणि खासगी बसेसला प्रतिबंध केला आहे.

ठळक मुद्देकाेराेना संसर्ग : भंडारा-बालाघाट सात फेऱ्या रद्द, एसटीबस बपेरापर्यंतच

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्रासह विदर्भात काेराेना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ हाेत असल्याने मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला प्रतिबंध केला आहे. तसेच आंतरराज्यीय खासगी बससेवेलाही यामुळे ब्रेक लागणार आहे. मध्य प्रदेश सरकारच्या अपर परिवहन आयुक्तांनी हा आदेश जारी केला असून, त्याची अंमलबजावणी २१ मार्चपासून करण्याचे निर्देशित केले आहे. यामुळे भंडारा- बालाघाट मार्गावरील सात बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या भंडारा विभागाच्या अनेक बसेस मध्य प्रदेशात जातात. शेकडाे प्रवासी एसटी बसने मध्य प्रदेशात जातात. तसेच खासगी बसेसचाही उपयाेग केला जाताे. परंतु अलीकडे महाराष्ट्रात विशेषत: विदर्भात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे.  त्यामुळे मध्य प्रदेश सरकारने खबरदारीची उपाययाेजना म्हणून महाराष्ट्रातून येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या आणि खासगी बसेसला प्रतिबंध केला आहे. मध्य प्रदेश सरकारच्या ग्वालियर येथील परिवहन आयुक्तांनी १८ मार्च राेजी एक पत्र जारी केले आहे. त्यात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश बससेवा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागात भंडाऱ्यासह गाेंदिया जिल्ह्याचा समावेश आहे. या विभागातील विविध आगाराच्या अनेक बसफेऱ्या मध्य प्रदेशासाठी सुरू करण्यात आल्या आहे. बालाघाट, वाराशिवनी मार्गावर अनेक बसेस धावतात. मात्र आता या आदेशामुळे भंडारा विभागातील मध्य प्रदेशासाठी असलेली आंतरराज्यीय बससेवा बंद करावी लागणार आहे. शनिवारी वाराशिवनी येथे जाणारी एसटी बस बफेरा येथे मुक्कामी ठेवली हाेती. भंडारा विभागातून सात बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र छत्तीसगढ राज्यातील डाेंगरगढ मार्गावरील बसेस सुरू असल्याचे सांगण्यात आले. सध्या काेरेाना संसर्ग वाढत असल्याने विविध उपाययाेजना केल्या जात आहे.

छत्तीसगढच्या सीमेवर ॲन्टिजेन चाचणी महाराष्ट्रातून छत्तीसगढ राज्यात जाणाऱ्या सर्व प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणी केली जात आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगढच्या सीमेवर असलेल्या बाघ नदी परिसरात छत्तीसगढ सरकारने चाचणी केंद्र उभारले आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्व प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात येते. निगेटिव्ह अहवाल आल्यास छत्तीसगढमध्ये प्रवेश दिला जाताे. या ठिकाणी चाचणीसाठी प्रवाशांना एक ते दीड तास ताडकळत राहावे लागत आहे. मात्र काेराेना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही व्यवस्था गरजेची असल्याचे प्रवासी सांगत आहे.

 

टॅग्स :state transportएसटी