शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांमुळे सावकारीला चाप

By admin | Updated: December 25, 2014 23:28 IST

ग्रामीण भागात महिलांचे बचत गट हे लाभदायी ठरत आहे. या माध्यमातून आर्थिक देवाण - घेवाणीचा व्याप वाढला आहे. कुटुंबातील आर्थिक कामे सहज होत आहेत. शिवाय बचत गटांचा सर्वाधिक

भंडारा : ग्रामीण भागात महिलांचे बचत गट हे लाभदायी ठरत आहे. या माध्यमातून आर्थिक देवाण - घेवाणीचा व्याप वाढला आहे. कुटुंबातील आर्थिक कामे सहज होत आहेत. शिवाय बचत गटांचा सर्वाधिक लाभ सध्या शेतकऱ्यांना होताना दिसत आहे. बँकेचे कर्ज न मिळाल्यास शेतकऱ्यांना सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत होते. मात्र आता बचत गटामुळे अवैध सावकार किंवा बँकेतून शेतकरी कर्ज न घेता सरळ बचत गटातून रक्कम घेत आहेत.महिला बचत गटाची आर्थिक उलाढाल ग्रामीण भागात वाढीस लागली आहे. यामुळे सावकारांकडून पैसे घेणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. यामुळे एकप्रकारे महिला बचत गटामुळे पुरुषांच्या सावकारीला आळाच बसल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही आर्थिक व्यवहाराचे चित्र बदलत आहे. पुरुषाच्या बचत गटाबरोबरच महिलांनीही बचत गटाची स्थापना केली. या माध्यमातून त्यांच्या कुटुंबांना हातभार लागत असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा भरात अनेक ठिकाणी महिला बचत गटाच्या महिलांनी लहान मोठे व्यवसाय सुरु केले आहेत.सध्या ते चांगल्या प्रकारे सुरु आहेत. ग्रामीण भागात महिलांच्या बचत गटाचा शेतकऱ्यांनाही चांगलाच फायदा होत आहे. मागील पाच वर्षात महिला बचत गटाचे प्रमाण वाढले आहे. या बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या कुटुंबांनाही आर्थिक हातभार लागत आहे. बचत गटातून आर्थिक मदत होत असल्याने अवैध सावकारीला आळा बसण्यास मदत होत असल्याचे दिसते.(शहर प्रतिनिधी)