शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बडतर्फे कामगारांना पूर्ववत करणार

By admin | Updated: February 1, 2016 00:38 IST

युनिडेरीडेंट कारखान्यातील बडतर्फे रोजंदारी कामगारांना व्यवस्थापन पुर्ववत कायम ठेवणार असून यापुढेही व्यवस्थापन कामगारांना कामावरुन कमी करणार नाही, ...

युनिडेरीडेंटचे व्यवस्थापन नमले : कामगार आयुक्तांच्या बैठकीत घेतला निर्णयतुमसर : युनिडेरीडेंट कारखान्यातील बडतर्फे रोजंदारी कामगारांना व्यवस्थापन पुर्ववत कायम ठेवणार असून यापुढेही व्यवस्थापन कामगारांना कामावरुन कमी करणार नाही, अशी हमी कंपनी व्यवस्थापनाच्या प्रतिनिधीनी भंडारा येथील कामगार आयुक्तांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत दिली. या प्रकरणाचे सविस्तर उत्तर ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत सादर करण्याचे आदेश कामगार आयुक्तांनी कंपनी व्यवस्थापनाला दिले.युनिडेरीडेंट कारखाना व्यवस्थापनाने गुरुवारी, कपंनी व्यवस्थापनाने १०० रोजंदारी कामगारांना कामावर घेतले नाही. यामुळे कामगार व कपंनी व्यवस्थापनात तणाव निर्माण झाला. अस्थायी कामगारांनी संघटनेचा कारखान्याबाहेर लावलेला फलक उखडून टाकण्यात आला. याची तक्रार कामगारांनी पोलीस ठाण्यात दिली. कामगार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत पंचबुध्दे यांच्या नेतृत्वात कामगारासोबत कामगार आयुक्त जे. ए. बोरकर यांची भंडारा येथे कार्यालयात भेट घेवून निवेदन दिले. कामगार आयुक्तांनी व्यवस्थापनाला पाचारण केले. व्यवस्थापनाचे प्रतिनिधी म्हणून कारखान्याचे व्यवस्थापक जुनारकर व चक्रवर्ती भंडारा येथे हजर झाले.बैठकीत कामगार संघाचे अध्यक्ष पंचबुध्दे यांनी सदर कामगार १० ते १५ वर्षापासून कारखान्यात काम करत असून उत्पादन प्रक्रियेत सहभागी आहेत. आॅपरेटर, मदतनीस कामे करीत असल्यावरही व्यवस्थापन मूलभूत हक्कापासून वंचित ठेवत आहे. कारखान्यात यंत्रावर काम करीत असल्याचा कामगारांचे छायाचित्र पूरावा म्हणून दाखविण्यात आले. कामगारांची वरिष्ठ यादी सादर करण्यात आली. व्यवस्थापनाने कामगार उत्पादन प्रक्रियेमध्ये काम करतात हे मान्य केले. बदली कामगार म्हणून यंत्रावर कामे करतात हेही मान्य केले. कामगारांची वरिष्ठ यादी तपासून बघावी लागेल, असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. येथे कामगारांना शासनाचे किमान वेतन अधिनियमानुसार व्यवस्थापन अंमलबजावनी करीत नाही. बैठकीत व्यवस्थापन प्रतिनिधीनी कामगारांना कामावरुन बंद केलेले नाही. तसेच चर्चेदरम्यान व्यवस्थापन कामगारांना कामावरुन बंद करणार नाही. आज तारखेपर्यंत कामगारांना बंद केलेले नाही, अशी लेखी हमी व्यवस्थापन प्रतिनिधीनी दिली. या बैठकीत भंडारा जिल्हा कामगार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पंचबुध्दे, रामदास हलमारे, कार्याध्यक्ष कैलास दामन, महासचिव मुरलीधर, सहसचिव चंद्रकुमार कुथे, रंजित कटरे, हरिश कहालकर, मुकूंद बांतेसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)