शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गाेसेचे बॅक वाॅटर शिरले धान शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 05:00 IST

गाेसे धरण प्रकल्प विभागाने पाण्याच्या पातळीत वाढ केली आहे. सध्या या प्रकल्पात २४४.५०० मीटर पाणी पातळी आहे. त्यामुळे बुडीत क्षेत्रात पाणी शिरले असून अद्यापही संपादित न झालेल्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे धरणाची अधिकत्तम पाणी साठवण पातळी २४५.५०० मीटर आहे. केवळ एक मीटर पातळी गाठायला कमी आहे. असे असतानाच अनेक शेतात पाणी शिरले आहे. अधिकत्तम पातळीपर्यंत साठवणूक झाल्यास अनेक शेतकऱ्यांचे नुकसान हाेण्याची भीती आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गाेसे धरणाच्या पाणी पातळीत वाढ हाेताच अद्यापही संपादित न झालेल्या शेतशिवारात बॅक वाॅटर शिरुन हाताशी आलेले धान या पाण्यात बुडाले आहे. भंडारा आणि पवनी तालुक्यातील सुमारे २०० हेक्टर क्षेत्रात पाणी शिरल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.गाेसे धरण प्रकल्प विभागाने पाण्याच्या पातळीत वाढ केली आहे. सध्या या प्रकल्पात २४४.५०० मीटर पाणी पातळी आहे. त्यामुळे बुडीत क्षेत्रात पाणी शिरले असून अद्यापही संपादित न झालेल्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे धरणाची अधिकत्तम पाणी साठवण पातळी २४५.५०० मीटर आहे. केवळ एक मीटर पातळी गाठायला कमी आहे. असे असतानाच अनेक शेतात पाणी शिरले आहे. अधिकत्तम पातळीपर्यंत साठवणूक झाल्यास अनेक शेतकऱ्यांचे नुकसान हाेण्याची भीती आहे.गाेसे प्रकल्पासाठी संपादित न झालेल्या आणि बुडीत क्षेत्रालगत असलेल्या शेतजमीन संपादित करण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. गत पावसाळ्यापूर्वी या शेतजमिनीची माेजणी सुरु करण्यात आली हाेती, परंतु पावसाळ्यात शेतात भात पिकाची लागवड झाल्याने माेजणी करता आली नाही. आता गाेसे प्रकल्प विभागाने नवीन तारीख देऊन तत्काळ शेतजमिनीची माेजणी करावी अशी मागणी हाेत आहे.प्रकल्पाचे बॅक वाॅटर बेला, दवडीपार, काेरंभी, सालेबर्डी या व इतर भंडारा तालुक्यातील गावांसह पवनी तालुक्यातील अनेक गावातील शेतशिवारात शिरले आहे. त्यात मदन माटे, याेकेश कुटे, मदन मिराशे, भगवान राखडे, लावाजी राखडे, रामकृष्ण वाट, विनाेद राखडे, शंकर मते, परमेश्वर मते, धनराज भाेयर, लक्ष्मण कुथे, भाऊराव राखडे आदींचा समावेश आहे. पाणी शेतात शिरल्याने तीन डीपी पाण्याखाली गेले आहेत. 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निवेदन- बॅक वाॅटर शिरलेल्या शेताची तत्काळ पाहणी करुन शेतकऱ्यांना माेबदला द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष यशवंत साेनकुसरे, काेरभीचे उपसरपंच मनाेहर नागदेवे, दवडीपारचे रवी वाट, आकाश राखडे, संजय लांजेवार, राकेश तंबुलकर, सुनील राखडे, मनाेज दुबे, कुणाल राखडे, अमित हुमणे, सुमेध वासनिक आदी उपस्थित हाेते. यासाेबतच वीज वितरण कंपनीला निवेदन देऊन तत्काळ वीजपुरवठा सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प