शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदाचा अनुशेष

By admin | Updated: May 24, 2015 01:18 IST

दर्जेदार आरोग्य सुविधा तथा स्वच्छतेकरिता नागरिक आणि रुग्ण यांनी सिहोऱ्याच्या ग्रामीण रुग्णालयाला उत्तमतेची पावती दिली असताना आ.चरण वाघमारे यांच्या अकस्मात भेटीत ...

चुल्हाड (सिहोरा) : दर्जेदार आरोग्य सुविधा तथा स्वच्छतेकरिता नागरिक आणि रुग्ण यांनी सिहोऱ्याच्या ग्रामीण रुग्णालयाला उत्तमतेची पावती दिली असताना आ.चरण वाघमारे यांच्या अकस्मात भेटीत सभापती कलाम शेख यांनी समस्यांचा डोंगर मांडला. यावेळी एन.सी.डी. योजना शासनाने बंद केल्याने त्यांनी विरोधही केला.५७ गावातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सिहोऱ्यात ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले. या रुग्णालयात दर्जेदार सेवा रुग्णांना दिली जात आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश खुणे आणि कार्यरत कर्मचाऱ्याच्या प्रयत्नाने रुग्णालयात स्वच्छता ठेवण्यात येत आहे. नजिकच्या मध्यप्रदेशातील रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयात धाव घेत आहे. अन्य रुग्णालयांना प्रेरणा ठरणारे वातावरण निर्मिती करण्यात आल्याने सेवेसंदर्भात तक्रार नाही. या रुग्णालयाला आ.चरण वाघमारे यांनी अकस्मात भेट देवून पाहणी केली. रिक्त पदांचा अनुषेक असतानाही दर्जेदार सेवा उपलब्ध करण्यात येत असल्याचे चित्र दिसले. या रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक १, वैद्यकीय अधिकारी १, अधिपरिचारिका २, क्ष किरण तंत्रज्ञ १, एक्सरे टेक्नीशियन १, शिपाई १, कक्ष सेवक १ अशी पदे रिक्त आहेत. या शिवाय खानावळी उपलब्ध नाही. रुग्णालयात शवविच्छेदन गृहाची निर्मिती करण्यात आली असली तरी अद्याप सुरुवात करण्यात आली नाही. वैद्यकीय अधिकारी ही सेवा देण्यासाठी तयार असताना जिल्हा आरोग्य विभाग गंभीर होत नाही. यामुळे २० कि.मी. अंतरावरील तुमसरात नातेवाईकांना धाव घ्यावी लागते.राज्याच्या आरोग्य विभागाने गरीबांना देण्यात येणारी एनसीडी योजनेअंतर्गत नि:शुल्क उपलब्ध करणारी तपासणी सेवा बंद केली आहे. यामुळे अन्याय करणारा निर्णय आहे. असा आरोप सभापती कलाम शेख यांनी केला. या योजने अंतर्गत वैद्यकीय अधिकारीसह ५ कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली होती. यात कॅन्सर, ब्लड प्रेशर, शुगर, रक्त आदी तपासणी करीत होते. ही तुपासणी रुग्णालयात तथा गावागावात कॅम्प, शिबिराच्या आयोजनात होत होती. परंतु राज्य शासनाने ही योजना बंद केली आहे. ग्रामीण भागात सामान्य गरीबांना नि:शुल्क तथा अल्प दरात उपलब्ध होणारी सेवा बंद करण्यात आल्याने खासगी लॅबमध्ये तपासणी करावी लागत आहे.राज्य शासनाना हा निर्णय गरीबांच्या विरोधात जाणारा असल्याने सभापती कलाम शेख यांनी या निर्णयाची आठवण ताजी करून दिली. या संदर्भात आरोग्य मंत्र्यांना निवेदन देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश पटले, बाला तुरकर, गजानन निनावे, मयूरध्वज गौतम, अशोक पटले, भास्कर सोनवाने, मुन्ना फुंडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)