महेंद्र निंबार्तेविरूद्धचे उपोषण : नोकरीच्या नावावर केली महिलेची फसवणूकलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काँग्रेसनेते महेंद्र निंबार्ते यांनी नोकरीच्या नावावर चार लाखांनी फसविले. पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी पाठराखण करीत असल्याने साकोली येथील देवांगणा चांदेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण सोडले. काँग्रेस नेते महेंद्र निंबार्ते यांनी देवांगणा चांदेवार यांना शिक्षिकेची नोकरी लावून देतो म्हणून सन २०११ ला चार लाख रूपये घेतले व नोकरी लावून दिली नाही. त्यानंतर त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देऊन वेळ मारून नेली. यामुळे देवांगणा चांदेवार यांनी नोव्हेंबर मध्ये साकोली पोलिसात तक्रार दाखल केली होती. ८ मार्च ला निंबार्ते यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. परंतु तीन महिन्यानंतरही निंबार्ते यांना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे निबांर्ते यांना अटक करा या मागणीसाठी देवांगणा चांदेवार यांनी ५ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. अप्पर पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी उपोषणकर्त्या चांदेवार यांना भेटून न्याय मिळवून देतो, असे आश्वासन दिले. त्यानंतर स. पोलीस निरिक्षक सुधिर वर्मा यांना पेंडालमध्ये पाठवून लिंबू पाणी पाजून उपोषण सोडण्यात आले. यावेळी रिपब्लीकन सेनेचे जिल्हाध्यक्ष तुलशिराम गेडाम, भ्रष्ट्राचार विरोधी न्याय मंचचे प्रमुख विष्णु लोणारे, डी.जी. रंगारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
आश्वासनानंतर उपोषण मागे
By admin | Updated: June 10, 2017 00:22 IST