शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वनाधिकाऱ्यांवर कारवाईला टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 22:27 IST

मृत पावलेल्या मजुरांचे नाव मस्टरवर चढवून लाखो रुपये उचलून भ्रष्टाचार करणाऱ्या दोषी वनाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,...

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांना निवेदन : प्रकरण बोगस मजुरांचे

आॅनलाईन लोकमतभंडारा : मृत पावलेल्या मजुरांचे नाव मस्टरवर चढवून लाखो रुपये उचलून भ्रष्टाचार करणाऱ्या दोषी वनाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पर्यावरण बचाव कृती संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.मार्च २०१५ मध्ये भंडारा वन विभागातील सालेहेटी, नेरला, दिघोरी, आमगाव, डोडमाझरी व सर्पेवाडा येथील झुडपी जंगलात मिश्र रोपवनाचे काम करण्यात आले. या कामावर भोजराम दोडकू वरठे रा. सर्पेवाडा या मजुराचे नाव मस्टरवर लिहीण्यात आले होते. भोजराम वरठे हा इसम कामावरील तारखेच्या वर्षभरापुर्वीच मरण पावला आहे. या रोपवनाच्या कामावर ३ लाख ९९ हजारांचा निधी खर्च केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. माहाका ते कोकणागड कक्ष क्रमांक १५१ मधील सुरक्षित वनात झाडाची पालवी येण्यासाठी फांद्या कापणे व जाळणे हे काम करण्यात आले. या कामावर नारायण दसाराम अंबादे रा. वाघबोडी या इसमाचे नाव मस्टरवर लिहीण्यात आले. या इसमाचेही निधन झाले आहे. त्याच्या नावानेही मोठी रक्कम उचलण्यात आली आहे.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबंधित वन अधिकारी, क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक यांच्यावर कारवाई करण्यासाठी वन विभागाला अनेकदा तक्रार करण्यात आली. परंतु, सर्व पुरावे असतानाही अद्याप एकावरही कारवाई निश्चीत करण्यात आली नाही. तथापि, या प्रकरणाची तक्रार पोलिसात करण्यात आली. परंतु, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने समितीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. या निवेदनात भंडारा वनपरिक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक गौरी नेवारे, बिट रक्षक घुले, आर.के. देशमुख, डब्ल्यु. आर. खान व अन्य कर्मचाऱ्यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. या कर्मचाऱ्यांनी मृत नारायण अंबादे याचा मुलगा संतोष याला हे प्रकरण उघडकीस आणू नये, म्हणून दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसे शपथपत्रसुद्धा संतोष अंबादे याने दिले आहे. सर्व पुरावे असतानाही कारवाईस का टाळाटाळ होत आहे, हा प्रश्न आहे. तथापि, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जावी, अशी मागणी पर्यावरण बचाव कृती संघर्ष समितीने पोलीस अधीक्षकांना केली आहे.