शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

लाखनी तालुक्यात ४१९ हेक्टरमध्ये आवत्याची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:00 IST

लाखनी तालुक्यात सन २०२०-२१ खरीप हंगामात भात पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २२ हजार ६३१ हेक्टर आहे. यापैकी आवत्याचे क्षेत्र ६९८ हेक्टर व धानाचे पऱ्हे नर्सरी २ हजार १९३ हेक्टरवर आहेत. नर्सरी १४२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तालुक्यात सिंचनाच्या सुविधा असलेल्या ठिकाणी पऱ्हे लावण्यात आली आहेत. तसेच आवत्याची पेरणी केली आहे. कोरडवाहू क्षेत्रातील आवत्या व पऱ्हे रखडलेली आहेत.

ठळक मुद्दे२७४ मिमी. पावसाची नोंद : रोवणीला प्रारंभ, ऊसाचे क्षेत्र घटले, दमदार पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यात खरीप हंगामातील धान रोवणीला प्रारंभ झाला आहे. तालुक्यात अद्यापपर्यंत १८ हेक्टर क्षेत्रात रोवणी झालेली आहे. ४१९ हेक्टर क्षेत्रात धानाच्या आवत्या टाकल्या आहे. आवत्याचे सर्वसाधारण क्षेत्र ६९८ हेक्टर आहे. तालुक्यातील जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १४९ मिमी आहे. आतापर्यंत २७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. टक्केवारी १८३.२० आहे. वातावरण ढगाळ व थंड असून कुठेकुठे पावसाच्या तुरळक सरी येत असल्याने धानाची पऱ्हे हिरवीकंच दिसून येत आहेत.लाखनी तालुक्यात सन २०२०-२१ खरीप हंगामात भात पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २२ हजार ६३१ हेक्टर आहे. यापैकी आवत्याचे क्षेत्र ६९८ हेक्टर व धानाचे पऱ्हे नर्सरी २ हजार १९३ हेक्टरवर आहेत. नर्सरी १४२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तालुक्यात सिंचनाच्या सुविधा असलेल्या ठिकाणी पऱ्हे लावण्यात आली आहेत. तसेच आवत्याची पेरणी केली आहे. कोरडवाहू क्षेत्रातील आवत्या व पऱ्हे रखडलेली आहेत. २२ व २३ जून रोजी पाऊस होताच त्यानंतर पावसाने पुन्हा दांडी मारली आहे.तालुक्यात तूर पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र १९४६ हेक्टर आहे. सध्या तूर ७०६.६० हेक्टर क्षेत्रावर पेरणी केलेली आहे. पेरणीचे काम अद्यापही सुरु आहे. तालुक्यात ३२.८० हेक्टर क्षेत्रात भाजीपाल्याची लावगड झाली आहे. यात भेंडी, चवळी, कारले, मिरची, वांगी, दोडका, लवकीची लागवड केली आहे. तालुक्यात ऊसाचे क्षेत्र घटले आहे. सांख्यिकी विभागाच्या माहितीनुसार ३७७ हेक्टर क्षेत्रा ऊस लागवड केली जायची ते क्षेत्र घटलेले आहे. खरीप तिळ १६७ हेक्टरऐवजी, १० हेक्टर क्षेत्रात लावलेले आहे. उस लागवड करणारे शेतकरी धानाकडे वळले आहेत.खरीप हंगामात शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. उस, तिळ तसेच बांधावर घेण्यात येणारे पिक कमी झाले आहे. रोवणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या कर्मचाºयाद्वारे शेतशिवारांना भेट देवुन प्रत्यक्ष माहिती देण्यात येत आहे.-पद्माकर गिदमारे,तालुका कृषी अधिकारी लाखनी

टॅग्स :agricultureशेती