शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

ज्योतिष्य हे कला नसून प्राचीन भारतीय शास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:59 IST

आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापासून या शास्त्राचा अभ्यास केला. त्यांनी दिवस, वार, नक्षत्र करण या पाच अंगाचा अभ्यास करून पंचांग तयार केले. पूर्वीच्या काळी पंचांगानुसार लोक आपले जीवनमान चालवित असत. परंतु आताच्या काळात पंचांगाचा अभ्यास कमी होत आहे.

ठळक मुद्देभुपेश गाडगे : ज्योतिष विद्यालयाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापासून या शास्त्राचा अभ्यास केला. त्यांनी दिवस, वार, नक्षत्र करण या पाच अंगाचा अभ्यास करून पंचांग तयार केले. पूर्वीच्या काळी पंचांगानुसार लोक आपले जीवनमान चालवित असत. परंतु आताच्या काळात पंचांगाचा अभ्यास कमी होत आहे. पंचांगाचा अभ्यास करून व ज्योतिष शास्त्राचा आधारे आल्या जीवनातील संकट दूर करावे व ज्योतिषाने सुद्धा समाज सेवेचे कार्य करावे, असे प्रतिपादन ज्योतिष विश्वविद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भुपेश गाडगे यांनी केले.येथील साई प्लॉझा हॉटेल येथे आयोजित विश्वविद्यापीठ प्रा. कोलंबो श्रीलंका द्वारा संचालित ज्योतिष विद्यालय भंडारा येथे द्वितीय वर्धापन दिनाच्या सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन, सरस्वती पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी प्राजक्ता संगीतराव यांनी सरस्वती स्तवन व नवग्रह स्त्रोत सादर केले.या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून डॉ. भुपेश गाडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ. अनिल वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून ज्योतिष विद्यालय भंडाराचे संचालक प्राचार्य डॉ. हितेंद्र सोरटे यांनी सत्कार केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हितेंद्र सोरटे यांनी ज्योतिष विद्यालयाने वर्षभरात जे उपक्रम राबविले त्याची माहिती व येणाऱ्या वर्षात होणाºया कार्यक्रमांची विस्तृत माहिती देण्यात आली.विद्यालयाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त पदवी प्रदान समारंभ पार पडला. यामध्ये विद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये डॉ. वनिता शाह, डॉ. रमेश उपलय, डॉ. मनिष खारा, डॉ. अरुणा येरणे, डॉ. कल्पना निकम यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी ज्योतिष विद्यालय भंडाराचे संस्थापक संचालक प्राचार्य डॉ. हितेंद्र सोरटे, मंजुषा सोरटे व आदित्य सोरटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे संचालन अतुल खोब्रागडे यांनी तर आभार प्रदर्शन शिवानी धनकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पंकजकुमार राजाभोज, नंदराम लिमजे, दिलीपकुमार सार्वे, अनिल तिघरे, पवन हेडाऊ, अविनाश हटवार, लोकेश मोहबंशी, श्रीकांत सार्वे, प्रतिक येरणे, प्रकाश जाधव, शिवानी कावळे, मोनिका इंगोले, भारती जांभुळकर, अर्चना कोडापे यांनी मोलाचे सहकार्य केले.