शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

रेतीघाटांचे लिलाव करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 21:57 IST

मार्च महिण्याला सुरुवात होऊनही पवनी तालुक्यातील रेतीघाट सुरु झाले नाही. त्यामुळे बांधकामाकरिता रेतीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देघरकूल बांधकाम रखडले : चोरीच्या रेतीवर महसूल प्रशासनाची नजर

आॅनलाईन लोकमतपालोरा (चौ.) : मार्च महिण्याला सुरुवात होऊनही पवनी तालुक्यातील रेतीघाट सुरु झाले नाही. त्यामुळे बांधकामाकरिता रेतीचा तुटवडा निर्माण झाला आहे. पवनी पंचायत समितीअंतर्गत दारिद्रयरेषेखाली जीवन जगणाऱ्या अनेक गरजू लाभार्थ्यांना विविध योजनेंतर्गत घरकूल मंजूर झाले आहेत. प्रत्येक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिला टप्पा निधी देण्यात आला. अल्पशा निधीने बांधकाम होत नसल्यामुळे व रेतीची टंचाई पाहून अनेकांनी घरकूलचे काम सुरु केले नाही. ज्यांनी घरकुलाचे बांधकाम सुरु केले आहेत ते लाभार्थी रेतीविना अडकले आहेत.पवनी तालुक्यात जवळपास सात ते आठ रेतीघाटांचा समावेश आहे. सध्यस्थितीत शासन निर्णयानुसार सर्वच रेतीघाट बंद आहेत. रेतीघाट बंद असल्यामुळे बांधकामाकरिता रेती मिळणे कठीण झाले आहेत. ज्या रेतीमाफीयाकडे रेतीचा स्टॉक भरलेला आहे. त्यांनी रेतीचे दर वाढवून ठेवले आहे. परिणामत: बांधकाम बंद करावे लागले आहे. दुसरीकडे लाभार्थ्यांनी लवकर बांधकाम करावे म्हणून पत्रव्यवहार केला जात आहे. काही रेतीमाफीयांकडून रेती चोरीचे प्रकार सुरु होते. त्यामुळे अनेकांना अल्पदरात रेती उपलब्ध होत होती. मात्र येथील तहसीलदार कोकूर्डे यांनी रेतीचोरी करणाऱ्या विरोधात काकारवाई सुरु केली. त्यानंतर रेती चोरीचे प्रकार बंद झाले आहेत. यात गरीब कुटूंबाची दयानीय अवस्था झाली आहे. मार्च महिना लागून सुध्दा रेतीघाट लिलाव न झाल्यामुळे तालुक्यात रेतीविना अनेक बांधकाम रखडले आहेत.संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी पवनी तालुका शिवसेना प्रमुख श्रीकांत मेश्राम व तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांनी केली आहे.घरकुल लाभार्थ्यांना अल्पदरात रेती द्यावीगरजू लाभार्थी हे पक्या घरात राहावे म्हणून शासनाकडून विविध योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप केल्या जात आहे. मात्र घरकुलाची रक्कम अल्प प्रमाणात मिळत असल्याने तेवढ्या निधीमध्ये बांधकाम करणे शक्य होत नाही. दिवसेंदिवस रेती, गिट्टी, लोहा, सिमेंट, मजूर यांचे भाव वाढत असल्यामुळे गरीब जनतेला बांधकाम करणे कठीण झाले आहे. तालुक्यातून ट्रकला रेतीची रॉयल्टी दिल्या जाते. मात्र ट्रॅक्टरला नाही. गरीब कुटूंबाना ट्रक बोलावणे शक्य होत नाही. घरकूल लाभार्थ्यांना ट्रॅक्टरद्वारे अल्पदरात रॉयल्टी देण्यात यावी अशी मागणी आहे.