शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या संविधानातील भारत उभा करण्याचा प्रयत्न

By admin | Updated: April 28, 2016 00:24 IST

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील भारत उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

रामदास आठवले : भारत-भीमयात्राचे स्वागतभंडारा : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील भारत उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बाबासाहेबांनी समाजव्यवस्था जोडली आहे. ‘जाती तोडो - भारत जोडो’ हा समता संदेश घेऊनच भारत भीमयात्रा देशभरात फिरत आहे. या यात्रेमधून माणसाला माणसाशी जोडण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आ) अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले. यावेळी खा.आठवले म्हणाले, आम्ही भाजपाला साथ दिली याचा अर्थ आम्ही भाजपचा ‘अजेंडा’ चालवितो, असे नाही. ही राजकीय युती आहे. भविष्यात आम्ही पक्षासोबत राहूच असेही नाही. आमचा पक्ष निळ्या झेंडा घेऊन जात आहे. प्रधानमंत्री मोदी यांची भूमिका योग्य आहे. दलित समाजाच्या आरक्षणाला कुणीही हात लावत नाही. ज्यांना आरक्षण नाही, असे महाराष्ट्रातील मराठा, गुजराततेतील पटेल, राजस्थानातील राजपुत आणि हरियाणातील जाट समुदायाला आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी आपण संसदेत केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समतेचे विचार आहे, आणि याच विचाराने प्रेरित होऊन आम्ही भारत भीमयात्रेला सुरुवात केली आहे. २६ जानेवारीला कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही यात्रा २८ हजार किलोमीटरचे अंतर कापत बुधवारला भंडाऱ्यात आली आहे. या यात्रेचा समारोप १ मे रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महू या ठिकाणी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ) भंडारा जिल्ह्याच्यावतीने बुधवारला दुपारी त्रिमूर्ती चौकात भारत भीम यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही यात्रा छत्तीसगड राज्यातील राजनांदगावकडे रवाना झाली. यावेळी आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, रिपाई (आ)चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, दयाल बहादुरे, म.दा. भोवते, बोरकर, अमृत बन्सोड, आसीत बागडे, भाजपचे शहर अध्यक्ष चंद्रशेखर रोकडे, मयुर बिसेन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)