शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

लाखनीत व्हॅन चालकाकडून शिक्षिकेच्या अपहरणाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 19:01 IST

शाळेत शिकविणार्‍या शिक्षिकेच्या अपहरणाचा प्रयत्न शाळेत विद्यार्थी आणणार्‍या व्हॅन चालकाने केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या वेळी घडली.

लाखनी (भंडारा) :  शहरातील एका खासगी कान्व्हेंट शाळेत शिकविणार्‍या शिक्षिकेच्या अपहरणाचा प्रयत्न शाळेत विद्यार्थी आणणार्‍या व्हॅन चालकाने केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या वेळी घडली. मात्र पीडितेने प्रसंगावधान राहून तेथून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. लाखनी पोलिसांनी आरोपीला रात्री दीड वाजताच्या सुमारास सिंधीपार/ मुंडीपार येथील आरोपीच्या नातेवाईकाच्या घरून अटक केली. आशीष सुरेश टेंभुर्णे  (वय 30, रा. तलाव वार्ड लाखनी) असे आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील खेडेगावातून शहरात एका खासगी कान्व्हेंट शाळेत शिकविणार्‍या शिक्षिकेस शाळेत विद्यार्थी आणणार्‍या व्हॅन चालकाने लाखनी बसस्थानकासमोर पीडितेस व तिच्या मैत्रिणीस गाडीत बसवून लाखनी येथील बाजार समिती समोर गाडी थांबवून पीडितेच्या मैत्रिणीस उतरविले, तेव्हा पीडितासुद्धा उतरली. आरोपी आशीष सुरेश टेंभुर्णे याने पीडितेस जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवून “तू माझ्याशी लग्न न करता दुसर्‍यासोबत लग्न कशी काय करतेस ?”असे बोलून तसेच डोक्याचे केस पकडून खासगी व्हॅनगाडीमध्ये डांबून अपहरण करून माणेगाव मार्गे आलेसुर, मासलमेटा, खेडेपार कडून लाखोरी गावाजवळील संजय नगर परिसरात आणून पीडितेस उतरविले व स्वत: व्हॅन गाडीसह पळून गेला.पीडितेने ही माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी पीडितेसह  पोलीस स्टेशनमध्ये येऊन घटनेची माहिती दिली.  घटनेचे गांभीर्य लाखनीचे पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार यांनी लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी तुकाराम काटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार, उपनिरीक्षक रवींद्र म्हैसकर, सहाय्यक उपनिरीक्षक विजय हेमणे, नरेंद्र मुटकुरे पोलिस हवालदार भगवान थेर, दिगंबर तलमले, सुभाष राठोड, पोलिस नायक उमेश शिवणकर, लोकेश ढोक, महिला पोलिस नायक शालू भालेराव, वासंती बोरकर, वर्षा खोब्रागडे पोलिस शिपाई पीयुष बाच्चल, नितिन झंझाड, अनिल राठोड, राजेंद्र लांबट, जितेश रोडगे   यांची आरोपी शोध दृष्टीने  3 पथके तयार करून पोलिसांनी रात्री दीड वाजताच्या सुमारास सिंधीपार/ मुंडीपार येथील आरोपीच्या नातेवाईकाच्या घरून अटक केली.

पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी आशीष सुरेश टेंभुर्णे याच्या विरुद्ध अपहरण, विनयभंग  सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ करून थापड भुक्यांनी  मारहाण करून  तिचा  विनयभंगतसेच जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकणी  लाखनी पोलिसांनी आरोपी विरूद्ध अप. क्र. ४९/२०२० कलम ३६४ अ, ३६६,३५४, २९४, ३२३, ५०६ भादवि नुसार गुन्हा नोंद केली असून घटनेचा तपास लाखनीचे पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार, पोलिस हवालदार भगवान थेर, पोलिस नायक सुभाष हटवार करीत आहेत. आरोपी हा विवाहित असून लाखनी येथील रहिवासी आहे. तसेच त्याला १ मुलगा व १ मुलगी आहे.