लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पवित्र अस्थी कलशाचे भंडारेकरांनी शनिवारला दर्शन घेतले.अटलजींच्या अस्थीचा कलश भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे दर्शनाकरिता आणण्यात आला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, वामन बेदरे, नूतन कांबळे, भारती दिवटे, राजेश बांते, डॉ. प्रकाश मालगावे, प्रशांत खोब्रागडे, धनवंता राऊत उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी अस्थींच्या दर्शनाकरिता ठेवण्यात आला होता. त्यानंतर पूर्ण जिल्ह्यातून प्रवास करून अस्थी कलशाचे भंडारा तालुक्यातील सिरसी येथे आगमन झाले. यावेळी नगराध्यक्ष सुनील मेंढे, चंद्रशेखर रोकडे, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष आशु गोंडाने, चैतन्य उमाळकर, मुुकेश थानथराटे, प्रशांत खोब्रागडे, प्रा. हेमंत देशमुख, दिनकर गिरडकर, मयूर बिसेन, मंगेश वंजारी, विकास मदनकर, कृष्णकुमार बत्रा, रोशनी पडोळे यांनी अस्थी कलशाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.त्यानंतर कलश रॅलीद्वारे गांधी चौक भंडारा येथे आगमन झाल्यावर दर्शनार्थ ठेवण्यात आला. वैनगंगा नदीच्या पात्रात मंत्रोपचाराने व 'अटलजी अमर रहे' या घोषणेने अटलजींच्या अस्थिंचे विसर्जीत करण्यात आले.यावेळी यात्रा प्रमुख आमदार डॉ. रामदास आंबटकर, आमदार अनिल सोले, आमदार चरण वाघमारे, आमदार विजय रहांगडाले, आमदार अॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाध्यक्ष तारीकजी कुरैशी, तानुभाऊ पटले, सुनील मेंढे, प्रदीप पडोळे, रमेश कुथे, बाळा अंजनकर, मुन्ना पुंडे, युवराज जमईवार, अरविंद भालाधारे,विनोद बांते, नगर परिषद भंडाराचे नगरसेवक व नगरसेविका, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अटलजींच्या अस्थिकलशाचे भंडारावासीयांनी घेतले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:09 IST