शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

हागणदारीमुक्तीसाठी रासेयो सेवकांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 22:02 IST

राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने ग्रामस्तरावर सामाजिक बांधिलकीचे विविध कार्य पार पाडल्या जातात.

ठळक मुद्देमनोजकुमार सूर्यवंशी : अकरा महाविद्यालयांवर सोपविणार जबाबदारी

आॅनलाईन लोकमतभंडारा : राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने ग्रामस्तरावर सामाजिक बांधिलकीचे विविध कार्य पार पाडल्या जातात. त्यांचे कार्य व्याख्यानाजोगे असून आता रासेयो विदयार्थ्यांनी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमात सहभाग घेवून सामाजिक दायत्विाने स्वच्छतेच्या कायार्ने गावांना नंदनवन करण्यासाठी हागणदारीच्या जागा स्वच्छ व सौंदर्यीकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी केले.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण कार्यक्रमांतर्गत आयोजित बैठकी प्रसंगी ते बोलत होते.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्षात पार पडलेल्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक शहा, अजय गजापूरे, दिपक बोडखे, व जिल्ह्यातील अकरा महाविद्यालयाचे कार्यक्रम समन्वयक यांची उपस्थिती होती.जिल्ह्याची हागणदारीमुक्त प्लसच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून स्वच्छतेच्या कार्याला चालना देण्यासाठी अनेक ग्राम पंचायतीमध्ये गावातील हागणदारीच्या जागेची स्वच्छता व सौंदर्यीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेला आहे. स्वच्छतेबरोबरच आता प्लॉस्टीक बंदीची मोहिम राबविण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यात ही मोहीम अधिक गतीशिल व्हावी, याकरिता आता रासेयो विभागांचा सहभाग घ्यायचा आहे. त्या उद्देश्याने भंडारा येथील जे.एम.पटेल महाविद्याल व आठवले महाविद्यालय यांचेसह जिल्ह्यातील अकरा महाविद्यालयाची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्षात बोलविण्यात आली होती.प्रत्येक महाविदयालयांनी या करिता ३ गावे दत्तक घ्यावीत. त्या गावांमध्ये हागणदारीच्या जागेची स्वच्छता करण्यासाठी दिवसभर श्रमदान, स्वच्छता रॅली, पथनाटयांच्या माध्यमातून मार्गदर्शन करून जनजागृती करावी व भंडारा जिल्हयाला राज्यात दिशादर्शक ठरण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. शाळा व अंगणवाडी स्तरावर स्वच्छतेचे महत्व सांगून धडे देणे, प्लॉस्टीक बंदीसाठी वातावरण तयार करणे याकरिता कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्यावर भर देणे, पावसाळयात वृक्षारोपणासाठी पुढाकार घेणे यासह गावांना स्वच्छ व सुंदर करण्यासाठी विविध उपक्रम या माध्यमातून राबविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. मनोजकुमार सुर्यवंशी यांनी आवाहन केले.नागरिकांचे जिवनमान उंचावण्यासाठी, पर्यावरणाचे संवर्धनासाठी, निरोगी आरोग्यासाठी व विविध पैलूंनी महत्वाचा व नाविण्यपूर्ण, नागरिकांच्या हिताचे कार्य भंडारा जिल्हयात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला अधिक गतिशील करण्यासाठी रासेयो विभागाचे जिल्हयातील अकरा महाविदयालयाचे कार्यक्रम अधिकारी यांनी सहभाग देण्याचे अभिवचन दिले. यावेळी कार्यक्रम अधिकारी राजेंद्र शहा, आठवले समाजकार्य महाविदयालयाचे डॉ. नरेश कोलते, निर्धनराव पाटील महाविदयालयाचे लाखनी यू.पी. शहारे, संताजी महाविदयालय पालांदूर संजयकुमार निंबेकर, श्यामरावबापू कापगते महावियालय साकोली प्रा. गणेश पाथोडे, कला वाणिज्य महाविदयालय पेट्रोल पंप जवाहरनगर विजय गणवीर, साई कला वाणिज्य महाविदयालय तूमसर संदीप चामट, समर्थ महाविदयालय लाखनीचे श्री धनंजय गि-हेपूंजे, निर्धनराव पाटील वाघाये महाविदयालय एकोडीचे डॉ. सोपान बोंडे, कला वाणिज्य महाविदयालय करडीचे निलकंठ सोनेकर यांची उपस्थिती होती.