शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गोंदेखारी येथे पट्टेदार वाघाचा इसमावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 06:00 IST

गणेश बनकर (५२) रा.गोंदेखारी असे जखमी इसमाचे नाव आहे. तुमसर तालुक्यातील गोंदेखारी गावातील नाल्यातून शनिवारी सकाळी ८ वाजता वाघाची डरकाळी गावकऱ्यांना ऐकू आली. गावालगत वाघ असल्याची जाणीव झाली. त्यामुळे गावातील अनेकांनी नाल्याच्या दिशेने धाव घेतली. वाघाचा शोध सुरु झाला. परंतु वाघ झुडूपात लपून असल्याने तो सुरुवातीला दिसला नाही. मात्र वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या. एका झुडूपात शोध घेत असताना गणेश बनकर या इसमावर वाघाने अचानक हल्ला केला.

ठळक मुद्देगावकऱ्यात दहशत । वाघाला पिटाळून लावण्यात गावकऱ्यांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : गावालगतच्या नाल्यात लपून बसलेल्या वाघाला हुसकावून लावण्यासाठी गेलेल्या गावकºयातील एका इसमावर पट्टेदार वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना तुमसर तालुक्यातील गोंदेखारी शिवारात शनिवारी सकाळी ८ वाजता घडली. वाघाच्या दर्शनाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान गावकऱ्यांनी तुर्तास या वाघाला पिटाळून लावले असले तरी या वाघाची दहशत मात्र दिसत आहे.गणेश बनकर (५२) रा.गोंदेखारी असे जखमी इसमाचे नाव आहे. तुमसर तालुक्यातील गोंदेखारी गावातील नाल्यातून शनिवारी सकाळी ८ वाजता वाघाची डरकाळी गावकऱ्यांना ऐकू आली. गावालगत वाघ असल्याची जाणीव झाली. त्यामुळे गावातील अनेकांनी नाल्याच्या दिशेने धाव घेतली. वाघाचा शोध सुरु झाला. परंतु वाघ झुडूपात लपून असल्याने तो सुरुवातीला दिसला नाही. मात्र वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या. एका झुडूपात शोध घेत असताना गणेश बनकर या इसमावर वाघाने अचानक हल्ला केला. हा प्रकार पाहताच उपस्थित गावकºयांनी आरडाओरडा केला. त्यामुळे वाघ लगतच्या शेतात पळून गेला. जखमी गणेश बनकरला सिहोराच्या ग्रामीण रुग्णालयात व नंतर अधिक उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गाव शिवारात वाघ शिरल्याची माहिती बपेरा वनविभागाला देण्यात आली. तसेच घटनास्थळावर सिहोरा पोलिसांनीही धाव घेतली. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागामार्फत पिंजरा लावण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. गावाजवळ वाघ आल्याचे माहित होताच शेकडो नागरिकांनी घटनास्थही धाव घेतली.गावाच्या शेजारी वाघाचे दशर््न झाल्याने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान तुर्तास गावकऱ्यांनी या वाघाला पिटाळून लावले आहे. सदर वाघ बपेरा शिवाराच्या दिशेने गेला. या शिवारात महालगाव, बिनाखी, सुकळी, गोंडीटोला, देवसर्रा ही गावे आहेत. या गावातील नागरिकांना सूचना देण्यात आली आहे. गावात भीतीचे वातावरण आहे.जंगलात नागरिकांचा शिरकावसातपुडा पर्वतरांगातील ग्रीन व्हॅली चांदपूरच्या घनदाट जंगलात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आहे. परंतु अलिकडे जंगलात पार्टीच्या नावाखाली नागरिकांचा शिरकाव सुरु झाला. त्यामुळे वन्यप्राणी सैरवैर होत असून गावाकडे धाव घेत आहे. अशाच प्रकारात पट्टेदार वाघ या परिसरात आला असावा असा कयास आहे. चांदपूर जंगलात पर्यटन स्थळावर कुणाचेही नियंत्रण दिसत नाही. यासंधीचा फायदा घेत अनेकदा ओल्या पार्ट्याही जंगलात होतात. वन्य जीवांच्या नैसर्गीक अधिवासाला यामुळे धोका निर्माण होतो. वन्यप्राणी धोक्यात आले आहे. गत काही वर्षात नागरिकांची जंगल भ्रमणाची गर्दी वाढली आहे. परंतु वनविभागाच्या नियमाकडे दुर्लक्ष होत आहे. वनविभागही याकडे लक्ष देत नाही.

टॅग्स :Tigerवाघ